गेल्या एका महिन्यात सुमारे 11 लाख भारतीय खाती बंद केली आहेत. ट्विटरने एकूण 11,32,228 भारतीय युजर्सच्या अकाउंटवर बंदी घातली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही अकाऊंट्स शोषण आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणारे ट्विट करणारी असल्याचं म्हटलं आहे.
264 खाती गैरवर्तनामुळे बॅन करण्यात आली आहेत. यानंतर घृणास्पद वर्तनासाठी 84 खाती बंद करण्यात आली. याशिवाय सेंन्सेटिव्ह फोटो, व्हिडीओ किंवा माहिती अपलोड केल्याबद्दल 67 जणांवर कारवाई करण्यात आली. बदनामीमुळे 51 खाती बंद करण्यात आली आहेत.
ट्विटरवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी 1843 खाती बंद करण्यात आली आहेत अशी माहिती एलन मस्क यांनी दिली आहे. त्यामुळे कोणताही कंटेन्ट, फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट करताना तुमच्याकडून या चुका होणार नाहीत याची काळजी घ्या.
ट्विटरने आपले धोरण अधिक कठोर केलं आहे. फेसबुकसारखेच कठोर नियम ट्विटरवरही लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कंटेन्ट पोस्ट करताना काळजी घेणं आवश्यक आहे.
ज्यांचं खातं व्हेरिफाइड नाही असे युजर्स एका दिवसाला फक्त हजार ट्विट वाचू शकतात. व्हेरिफाइड युजरना मात्र 10 हजार ट्विट वाचता येणार आहेत.