NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PM Modi Birthday Special : नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आणि प्रेरक विचार; पहा PHOTO

PM Modi Birthday Special : नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदापर्यंतचा प्रवास आणि प्रेरक विचार; पहा PHOTO

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला. वडनगरच्या भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी शर्मिष्ठा तलावातून एक मगरीचं पिल्लू घरी आणलं होतं. पण, आईच्या सांगण्यावरून त्यांनी ते पुन्हा तलावात सोडलं.

111

नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 साली वडनगरमधील दामोदार दास मूलचंद मोदी आणि हीराबेन यांच्या घरात झाला.

211

वडनगरच्या भगवताचार्य नारायणाचार्य शाळेत त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणी त्यांनी शर्मिष्ठा तलावातून एक मगरीचं पिल्लू घरी आणलं होतं. पण, आईच्या सांगण्यावरून त्यांनी ते पुन्हा तलावात सोडलं.

311

1958 सालच्या दिवाळीला ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मोदींनी प्रचारक लक्ष्मणराव इनामदार यांच्याकडून स्वंयसेवकाची शपथ घेतली.

411

मोदींनी राज्यशास्त्रात MA चं शिक्षण घेतलं आहे. 17 व्या वर्षी नरेंद्र मोदी अहमदाबाद पोहचले. त्यानंतर 1974 साली नवनिर्माण आंदोलनात सहभागी झाले.

511

राजकारणात येण्यापूर्वी अनेक नरेंद्र मोदी हे स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे.

611

1980 साली गुजरातमधील भाजपमध्ये मोदींनी प्रवेश केला. त्यानंतर 1989 साली ते गुजरात भाजप युनिटचे महासचिव झाले. 1990 साली लालकृष्ण आडवाणींच्या सोमनाथ-अयोध्या रथ यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावली.

711

मुरलीधर मनोहर जोशी यांनी ज्यावेळी काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा फडविण्याच्या यात्रेत मोदी सहभागी झाले. त्यानंतर भाजपकडून अनेक राज्यांचे प्रभारी झाले.

811

1995 साली भाजपचे राष्ट्रीय सचिव आणि 5 राज्यांचे प्रभारी झाले. 1998 साली महासचिव झाले. 2001 पर्यंत ते या पदावर होते.

911

त्यानंतर ते 2001 मध्ये केशुभाई पटेल यांना गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून बाजूल केले आणि मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले.

1011

2012 पर्यंत मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी जबरदस्त काम केले आणि 3 वेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर भाजपमध्ये मोदींचा दबदबा इतका वाढला की, ते पंतप्रधान पदाचे दावेदार ठरले.

1111

2013 साली भाजपच्या प्रचार अभियानात पंतप्रधान पदासाठी मोदींच्या नावाची घोषणा झाली. 2014 मध्ये ते देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले.

  • FIRST PUBLISHED :