पंजाबमध्ये भगवंत मान यांच्या सरकारमध्ये शिक्षण मंत्री असलेल्या हरजोत बैस हे विवाहबंधनात अडकले. त्यांनी आयपीएस ज्योती यादव यांच्याशी लग्न केलं.
आयपीएस ज्योती यादव या हरजोत बैस यांच्या पत्नी बनल्या. त्या सध्या मानसा इथं पोलीस अधीक्षक पदी कार्यरत आहेत. शिक्षण मंत्री आणि आयपीएसच्या लग्नाची चर्चा सध्या पंजाबमध्ये होत आहे.
कॅबिनेट मंत्री हरजोत बैस यांचे लग्न गुरुद्वारा बिभोर साहिबमध्ये झालं. हरजोत सिंह रोपड जिल्ह्यातील आनंदपूर साहिब मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाबचे शिक्षणमंत्रीही आहेत. याआधी ते तुरुंग मंत्रीही होते.
ज्योती यादव या २०१९ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. सध्या त्या मानसा इथं पोलीस अधीक्षक पदी कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबिय गुरुग्राममध्ये राहते.
काही दिवसांपूर्वी हरजोत सिंह बैस आणि ज्योती यादव यांचा साखरपुडा झाला होता. सोशल मीडियावर दोघांचे एकत्र फोटोही व्हायरल झाले होते.