कमलाथल यांना त्यांचे नवीन घर मिळाल्याची माहिती महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर दिली. इडली अम्माचं हे घर खूप सुंदर आहे. (फोटो सौजन्य : twitter)
या घरात त्यांच्यासाठी खास स्वयंपाकघरही बनवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य : ANI)
कमलाथल शहर आणि आसपासच्या भागात 'इडली पाटी' किंवा 'इडली दादी' म्हणून प्रसिद्ध आहे. ती फक्त एक रुपयात लोकांना इडली सर्व्ह करते. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा त्यांच्या कामानं इतके प्रभावित झाले की, त्यांनी मदर्स डेच्या निमित्ताने या इडली अम्मांना एक सुंदर नवीन घर भेट दिलं. (फोटो सौजन्य : ANI)
आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “मदर्स डेच्या दिवशी अम्मा यांना भेट देण्यासाठी घराचं बांधकाम वेळेत पूर्ण केल्याबद्दल आमच्या टीमचे खूप खूप आभार. ती पालनपोषण, काळजी घेणं या आईच्या गुणांचं मूर्त स्वरूप आहे. त्यांना आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. (फोटो सौजन्य : ANI)
अशा प्रकारे त्यांनी पहिल्यांदाच त्यांच्या नवीन घरात प्रवेश केला. (फोटो सौजन्य : twitter)
इडली अम्माचं हे घर खूप सुंदर आहे.
यावेळी महिंद्रा ग्रुपची टीमही उपस्थित होती. (फोटो सौजन्य : twitter)
कमलाथल म्हणजेच 'इडली अम्मा' ही महिला गरिबांना मदत करण्यासाठी प्रति प्लेट 1 रुपयाने इडली विकते. कमलाथलची कहाणी सप्टेंबर 2019 मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली. (फोटो सौजन्य : twitter)
इडली अम्माची कथा व्हायरल झाल्यानंतर महिंद्रा यांनी त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. (फोटो सौजन्य : twitter)
कमलथलची कथा शेअर करताना, महिंद्रा यांनी ट्विट केलं होतं, 'अशा विनम्र कहाण्यांपैकी एक, जी तुम्हाला आश्चर्यचकित करते आणि विचारते की, तुम्ही जे काही करता ते कमलथल सारख्या लोकांच्या कामाइतकेच प्रभावी आहे का?' (फोटो सौजन्य : twitter)