NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / शिमल्यात Yellow Alert; पाहा, जोरदार गारपीटीमुळे तयार झाली पांढरी चादर PHOTOS

शिमल्यात Yellow Alert; पाहा, जोरदार गारपीटीमुळे तयार झाली पांढरी चादर PHOTOS

Himachal News: गारपिटीमुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात दोन दिवस 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शिमल्याच्या वरच्या भागात सफरचंद पिकाचं मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे. यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिमला व्यतिरिक्त मंडी आणि कुल्लूसह अनेक भागात पाऊस झाला आहे.

16

हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये मंगळवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि पावसासह गारपिटीला सुरुवात झाली. त्यामुळं वातावरण आल्हाददायक झालं. उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. गारपिटीमुळे रस्ता आणि जमिनीपासून ते घरांच्या छतापर्यंतही पांढरी चादर चढल्याचं दृश्य तयार झालं आहे. नजर जाईल तिथपर्यंत फक्त गारांची पांढरी चादर दिसते.

26

त्याचवेळी गारपिटीमुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शिमल्याच्या वरच्या भागात सफरचंद पिकाचं मोठं नुकसान झाल्याचंही सांगितलं जात आहे. यामुळे अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. शिमला व्यतिरिक्त मंडी आणि कुल्लूसह अनेक भागात पाऊस झाला आहे.

36

फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, गारपिटीनंतर शिमल्याच्या बाजारपेठेतील रस्त्यांवर बर्फाची पांढरी चादर पसरली आहे. लोक हातात बर्फ घेऊन खेळत आहेत.

46

त्याचवेळी, सकाळी चंबा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याची माहिती मिळाली. मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. पावसामुळे चंबा-पठाणकोट राष्ट्रीय महामार्गावरील चानेड येथील काली माता मंदिराजवळील नाल्यात पाणी आणि कचरा साचल्यानं वाहनांची वाहतूक ठप्प झाली.

56

त्याचवेळी मंडईतील धरमपूर येथील मंडप वगळता अन्य भागात सुमारे दीड तास मुसळधार पाऊस झाला. यादरम्यान गाराही पडल्या.

66

सकाळी दहाच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस झाला आणि नाले भरून वाहू लागले. त्यामुळे शेजारी असलेल्या दुकानांत पाणी शिरलं. राष्ट्रीय महामार्गावरही तासभर वाहनांची वाहतूक ठप्प झाली. यावेळी चंबा येथे जोरदार वादळ झालं.

  • FIRST PUBLISHED :