NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS: ट्रकची कारला भीषण धडक, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू

PHOTOS: ट्रकची कारला भीषण धडक, एकाच कुटुंबातील 9 जणांचा जागीच मृत्यू

Truck Eco Car Accident: तारापूरजवळ एका ट्रकनं इको कारला भीषण धडक दिली आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मयत एका कुटुंबीयातील आहेत.

110

आनंद: गुजरातमधील आनंद जिल्ह्यात तारापूरजवळ एका ट्रकनं इको कारला भीषण धडक दिली आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. सर्व मृतक एकाच परिवारातील असून ते इको कारने भावनगरवरून सुरतकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. मृत नऊ जणांमध्ये पाच पुरुष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. मृत कुटुंब भावनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

210

मिळालेल्या माहितीनुसार, तारापूरजवळील इंद्रनाज गावाजवळ हा अपघात झाला आहे. समोरून सुसाट वेगानं येणाऱ्या ट्रकनं इको कारला धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तारापूर चौकापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. हा ट्रक सुरतकडून मोरबीकडे जात होता.

310

तर अपघातग्रस्त इको कार तारापूरवरून वटमनकडे जात होती. या अपघातात कारमधील सर्व प्रवासी ठार झाले. ही टक्कर इतकी भीषण होती की इको कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.

410

ट्रकची धडक बसल्यानंतर इको कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इको कारमधील सर्व लोकांचे मृतदेह एकामागून बाहेर काढण्यात आले.

510

अपघातास कारणीभूत असणारा हा ट्रक मध्य प्रदेशातील आहे. तर संबंधित इको कारची प्रवासी कार म्हणून नोंद आहे.

610

संबंधित ट्रकचा क्रमांक MP 09 HF9642 आहे. तर इको कारची नोंद जामनगर आरटीओमध्ये आहे. GJ10 TV 0409 असा कारचा क्रमांक आहे.

710

मृतांमध्ये एका मुलीचा देखील समावेश आहे.

810

सर्वांचे मृतदेह कारमध्ये अडकून पडले होते.

910

ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली आहे.

1010

मृतांमध्ये सर्वजण एकाच कुटुंबीयांतील असल्यानं हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • FIRST PUBLISHED :