NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / PHOTOS : कशी काम करते प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC, कुठे आहे हेड क्वार्टर्स

PHOTOS : कशी काम करते प्रशांत किशोर यांची कंपनी I-PAC, कुठे आहे हेड क्वार्टर्स

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर सध्या काँग्रेसमध्ये प्रवेश न केल्यामुळे चर्चेत आहेत. काँग्रेसमध्ये जाण्याचा प्रस्ताव घेऊन ते सोनिया गांधींकडे पोहोचले, तेव्हा दुसऱ्याच दिवशी ते तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी निवडणूक लढवण्यासाठी त्यांच्या कंपनीच्या वतीने वाटाघाटी करत होते. तसंच, बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या विजयानंतर त्यांनी निवडणूक रणनीतीपासून स्वतःला बाजूला करण्याची घोषणा केली होती. जाणून घ्या त्यांच्या कंपनीबद्दल...

110

प्रशांत किशोर यांनी त्यांचे तीन सहकारी प्रतीक जैन, ऋषिराज सिंह आणि विनेश चंदेल यांच्यासमवेत 2013 मध्ये सिटिझन्स फॉर अकाउंटेबल गव्हर्नन्सची स्थापना केली. याचीच नंतर I-PAC ही प्रसिद्ध कंपनी बनली, जिचा डंका सध्या देशात सर्वत्र वाजत आहे. भारतीय राजकीय कृती समिती म्हणजेच, Indian Political Action Commitee. हे एक असं व्यासपीठ आहे, ज्यावर राजकीय योगदानासाठी जागा आहे आणि देशाच्या कारभाराबद्दलदेखील बोललं जाऊ शकतं. बघता बघता या कंपनीने गेल्या काही वर्षात एकापाठोपाठ अनेक मोठी यशशिखरं गाठली.

210

IPAC ने 2014 साली पहिल्यांदा भाजपमध्ये नरेंद्र मोदी यांच्यासाठी संपूर्ण राजकीय मोहिमेची धुरा हाती घेतली, ज्यामध्ये देशात प्रथमच राजकीय रणनीती, तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा पूर्ण वापर झाला. त्याच वेळी प्रशांत किशोर यांचं नाव मोठे राजकीय रणनीतीकार म्हणून पुढं आलं. त्यानंतर त्यांनी मोदी आणि भाजपपासून फारकत घेतली. मग ते इतर पक्षात आणि इतर राज्यात काम करताना आणि यश मिळवताना दिसले.

310

यानंतर ते बिहार निवडणुकीत नितीश कुमारांच्या यशात त्यांच्यामागे उभे राहिलेले दिसले. पंजाबमधील अमरिंदर सिंग यांच्या विजयात त्यांची कंपनी आणि त्यांचं नाव आलं. ते आंध्र प्रदेशातही वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांच्या मागे राजकीय रणनीतीकाराच्या भूमिकेत होते. आता बंगालमध्ये ममता बॅनर्जींचं जहाज हलवण्यासाठी भाजपने या निवडणुकीत सर्वस्व पणाला लावलं होतं. तेव्हा बंगालमध्ये भाजपने 100 जागा जिंकल्या तर आपण संन्यास घेऊ, असं म्हणणारा एकच माणूस होता. (पीटीआय फोटो)

410

बंगालमध्ये भाजपला केवळ 77 जागा मिळाल्या आणि 100 च्या आकड्यापासून 23 जागा दूर राहिल्या हे खरे आहे. यानंतर अनपेक्षितपणे प्रशांत किशोर यांनी राजकीय रणनीतीकाराच्या भूमिकेतून निवृत्ती जाहीर केली. ते म्हणाले की, आता ते त्यांच्या टीममधील इतर लोकांकडे काम सोपवणार आहेत. इतर कोणतीही भूमिका किंवा काम स्वतःच पाहतील. आता जाणून घेऊ की, आय-पॅक कंपनीची रचना कशी आहे आणि या कंपनीत प्रशांत किशोर यांची जागा घेऊ शकणारे लोक कोण आहेत.

510

प्रशांत यांच्यासोबत कंपनी सुरू करणारे प्रतीक जैन, ऋषिराज सिंग आणि विनेश चंदेल हे कंपनीचे सह-संस्थापक आहेत. प्रशांतनंतर हे लोक I-PAC चे मुख्य आधारस्तंभ आहेत. ते कंपनीचे संचालकही आहेत. कंपनीच्या कामकाजात प्रशांत किशोर यांच्यासोबत या तिघांचीही भूमिका खूप महत्त्वाची आहे. तिघेही तरुण आणि उच्चशिक्षित आहेत.

610

प्रतीक जैन यांनी आयआयटी मुंबईतून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. ते बिहारमधील पाटणाचे रहिवासी आहेत. त्यांनी डेलॉइट इंडिया कंपनीत ते अॅनालिस्ट म्हणून काम पाहिलं आहे. ते ट्विटरवर सक्रिय राहतात. बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर 03 मे रोजी त्यांनी ट्विट केलं. आम्ही करून दाखवलं. प्रतीक सहसा फारसे प्रसिद्धीझोतात येत नाहीत.

710

ऋषिराज सिंग हे I-PAC चे दुसरे सह-संस्थापक आहेत. ते दिल्लीचे आहेत. ते आयआयटी कानपूरमध्ये शिकले आहेत. ते एचएसबीसी बँकेत अ‌ॅनालिस्ट होते. ते Twitter वर आहेत. पण सहसा फारसे प्रसिद्धीझोतात येत नाहीत. ते I-PAC च्या लीडरशिप टीमममध्ये आहेत आणि कंपनीचे इतर सर्व प्रोजेक्टस देखील हाताळतात.

810

विनेश चंदेल या कंपनीचे तिसरे सह-संस्थापक आहेत. तेही तरुण आहेत. त्यांनी नॅशनल लॉ इन्स्टिट्यूट विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आहेत. त्यांनी काही दिवस सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली आहे. ते काही दिवस टाइम्स नाऊमध्ये बातम्यांचे विश्लेषक राहिले आहेत. हेही फारसे प्रसिद्धीझोतात नसतात. ट्विटरवर आहेत पण फारसे सक्रिय नाहीत.

910

I-PAC मधील संचालकांनंतर कार्यकारी परिषद (executive counsil) येते. यामध्ये सुमारे 10-12 लोक आहेत, जे आय-पॅकच्या विविध विभागांचे नेतृत्व करतात. त्यापैकी बहुतेक जण अत्यंत बुद्धिमान आहेत. सर्वजण देशातील बहुतेक चांगल्या संस्था किंवा महाविद्यालयांमध्ये शिकलेले आहेत. उच्चशिक्षित प्रोफेशनल्स आहेत. ते चांगल्या कॉर्पोरेट नोकऱ्या सोडून इथे आले आहेत. कंपनीमध्ये किमान 1000 लोक काम करतात. परंतु, प्रोजेक्टस आणि कॅम्पेनिंगच्या वेळी ही संख्या कमी होते किंवा वाढते.

1010

सध्या कंपनीचे मुख्यालय हैदराबादमधील बंजारा हिल्ससारख्या पॉश भागात आहे. हे चार मजली कार्यालय आहे. यामध्ये वेगवेगळ्या मजल्यांवर वेगवेगळी कामे केली जातात. याशिवाय, ते ज्या राज्यांतील काम करण्यास सुरुवात करतात, तिथेही त्यांचं तात्पुरतं कार्यालय तयार केलं जातं. I-PAC चे एक डझनहून अधिक विभाग आहेत, ज्यामध्ये क्रिएटिव्ह, ऑपरेशन्स, लॉजिस्टिक, स्ट्रॅटेजिक रिसर्च, पॉलिटिकल इंटेलिजन्स, लीडरशिप, डेटा अॅनालिटिक्स, सोशल मीडिया, डिझायनिंग, फोटोग्राफी या विभागांचा समावेश आहे.

  • FIRST PUBLISHED :