जगभरात आज योगदिन साजरा केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युएन हेडक्वार्टरमध्ये योगा केला.
भारतात सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांनी ५ हजार मीटरहून जास्त उंचीवर योगाभ्यास केला.
सियाचीन ग्लेशियरवर सैनिकांनी योगा केला. त्याचे फोटो आता व्हायरल होत आहेत.
लडाखमध्येही लष्कराच्या जवानांनी पेंगॉंग त्सो इथं योग दिनानिमित्त योगा केला.
सिक्कीममध्ये जवानांनी योगदिन साजरा केला. यामध्ये जवान बर्फात योगाभ्यास करताना दिसत आहेत.
राजस्थानमध्ये योग दिनानिमित्त भारतीय लष्कराच्या जवानांनी योगाभ्यास करून योग दिन साजरा केला.