भारताच्या नव्या गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस मोरमुगाओची चाचणी यशस्वी झाली. आयएनएस मोरमुगाओने पहिल्या ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल फायरिंगवेळी लक्ष्य अचूक टिपलं.
आयएनएस मोरमुगाओ हे भारताच्या शक्तीशाली युद्धनौकांपैकी एक असून त्याचं वजन ७ हजार ४०० टन इतकं आहे.
आयएनएस मोरमुगाओची लांबी १६३ मीटर आणि रुंदी १७ मीटर इतकी आहे.
ब्रह्मोस, बराक-८ यासारखी मिसाइल्स यावर आहेत. यात इस्रायलची रडार सिस्टिम एमएफ स्टार आहे. हवेत दूरवर असलेलं टार्गेटही यामुळे समजू शकतं.
१२७ मिलीमीटर गन असलेलं आयएनएस मोरमुगाओ हे ३०० किमी दूर अंतरावरील लक्ष्य टिपू शकते.