NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / नवरीसोबत रूममध्ये गेला अन् तिथेच भयानक घडलं; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू

नवरीसोबत रूममध्ये गेला अन् तिथेच भयानक घडलं; लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू

बिहारमधील भागलपूरमध्ये लग्नाच्या निमित्ताने रात्री पाहुण्यांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र सकाळी या आनंदाचं दु:खात रूपांतर झालं. नवरदेवाची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर दोन्ही कुटुंबात शोककळा पसरली. सकाळी मुलीच्या वडिलांनी आपल्या मुलीला डोलीत बसवून निरोप दिला, मात्र लग्नानंतर अवघ्या काही वेळातच वराचा मृत्यू झाल्याने नवरीला मोठा धक्का बसला.

17

छोटी खंजरपूर येथील रहिवासी मुकुंद मोहन झा यांचा अभियंता मुलगा विनीत प्रकाश याचं लग्न झारखंडच्या चाईबासा येथील रहिवासी जन्मजय झा यांची मुलगी आयुषी कुमारीशी झालं होतं.

27

दोघांनीही गुरुवारी रात्री थाटामाटात लग्न केलं. शीतला स्थान चौक, मोजाहिदपूर येथील एका विवाह मंडपात विवाह संपन्न झाला. यानंतर वधू-वर खोलीत एकत्र बसले होते, इतक्यात अचानक नवरदेवाची तब्येत बिघडली.

37

त्यानंतर मुलीकडील लोक नवरदेवाला जवाहरलाल नेहरू मेडिकल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. वराच्या बाजूचे लोक मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या घरी गेले.

47

दुसरीकडे, वधूच्या वडिलांचं म्हणणं आहे की, त्यांना संशय आहे की मुलाला आधीपासूनच काहीतरी आजार असेल आणि हे लग्न फसवणूक करून केलं गेलं आहे. याप्रकरणी वधूच्या वडिलांनी मोजाहिदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

57

दुसरीकडे, वराच्या वडिलांचं म्हणणं आहे की मुलगा निरोगी होता आणि तो दिल्लीत सॉफ्टवेअर इंजिनियर होता. पण काय झालं हे त्यांना कळू शकलेलं नाही. त्याचवेळी या घटनेनंतर ट्रेनी एएसपी अपराजित लोहन यांनी वराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

67

या घटनेचा संपूर्ण तपास पोलीस करत आहेत. एका बाजूला नवरी लग्नाची अनेक स्वप्ने घेऊन बसली होती. मात्र, दुसऱ्याच क्षणी स्वप्नांचा महाल क्षणार्धात तुटला.

77

आजूबाजूच्या लोकांमध्ये हा चर्चेचा विषय आहे, की मृत्यूचं कारण काय? आता शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं कारण काय, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याप्रकरणी पोलीस अद्याप काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

  • FIRST PUBLISHED :