NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवाला आला नाही, शेतकऱ्याने असा जुगाड केला की सगळे पाहतच राहिले!

शेत नांगरण्यासाठी ट्रॅक्टरवाला आला नाही, शेतकऱ्याने असा जुगाड केला की सगळे पाहतच राहिले!

विशेष म्हणजे हे दोन्ही शेतकरी फार शिकलेले नाहीत आणि शेतीसाठी कमी किंमतीची उपकरणं तयार करण्यासाठी कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत.

15

‘गरज ही शोधाची जननी असते’, ही आपल्यासाठी केवळ एक म्हण किंवा वाक्प्रचार असेल. परंतु देशातील दोन शेतकऱ्यांच्या जीवनात मात्र यामुळे खूप फरक पडला आहे. यातील एक शेतकरी बिहारमधील तर दुसरा तेलंगणामधील आहे. या दोघांनी शेती करताना पारंपरिक विचारप्रणालीचा अवलंब केला. एकाने एका चाकाचा तर दुसऱ्याने मोपेडद्वारे चालणारा नांगर तयार केला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही शेतकरी फार शिकलेले नाहीत.

25

तेलंगणातील निर्मल जिल्ह्यातील मुधोल मंडल मुख्यालयातील शेतकरी सोम कमला बापू यांच्या प्रेरणादायी कथेपासून आपण सुरुवात करूया. कापसाची लागवड करण्यासाठी शेतजमिनीची मशागत करण्याची त्यांची परिस्थिती नव्हती. मजुरांचा आणि ट्रॅक्टरचा खर्चही ते करू शकत नव्हते. मग त्यांनी आपल्या नातवाच्या मदतीने मुलाच्या मोपेड गाडीला नांगर जोडला आणि मोपेडवर चालणारा नांगर तयार झाला. त्यांचा नातू पुढे मोपेड चालवायचा आणि मागे आजोबा सोम बापू कापसाचं बियाणं पेरण्यासाठी नांगर धरायचे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी आजोबा आणि नातू दोघांवर कौतुकाचा वर्षाव केला.

35

सोम कमला बापू म्हणाले, 'मला माझा खिसा (आर्थिक परिस्थिती) माझ्या शेतजमिनीवर मजूर आणि ट्रॅक्टर आणण्यास साथ देत नाही. म्हणूनच मुलाच्या आणि नातवाच्या मदतीने मोपेडवर चालणारा नांगर तयार करण्याची कल्पना मला सुचली.'

45

तर दुसरीकडे बिहारच्या सहरसा जिल्ह्यात राहणाऱ्या दिनेश कुमार यांनीदेखील एका चाकाचा नांगर तयार केला आहे. लहान शेतात ट्रॅक्टर चालवणं कठीण असल्याचं कारण सांगून ट्रॅक्टर मालकाने त्यांच्या शेतात मशागत करण्यास नकार दिला होता. मात्र त्यामुळे दिनेश नाराज झाले नाहीत. पावसाळा सुरू झाल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत शेतजमिनीची मशागत करायची होती. त्यांनी एक चाक, सायकलचं एक हँडल आणि इतर आवश्यक वस्तू विकत घेतल्या आणि स्थानिक मेकॅनिकच्या मदतीने अवघे 1,500 रुपये खर्चून एका चाकाचा नांगर तयार केला. दिनेश यांनी शारीरिक ताकद आणि एका चाकाचा नांगर वापरून आपल्या शेतजमिनीची यशस्वीपणे मशागत केली.

55

'या नांगराचा वापर करून 5,445 स्क्वेअर फूट ते 6,806.25 स्क्वेअर फूट शेतजमिनीची मशागत करता येते. शेतकऱ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठीदेखील हा नांगर चांगला आहे. त्याची एकूण किंमत फक्त 3 हजार रुपये आहे', अशी माहिती दिनेश कुमार यांनी दिली.

  • FIRST PUBLISHED :