NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / Coromandel Express : किंग ऑफ साऊथ इस्टर्न रेल्वे, वर्षभर असते फुल्ल; का पडलं कोरोमंडल नाव?

Coromandel Express : किंग ऑफ साऊथ इस्टर्न रेल्वे, वर्षभर असते फुल्ल; का पडलं कोरोमंडल नाव?

कोरोमंडल एक्सप्रेसची सुरुवात 1977 मध्ये झाली होती. तेव्हा ही सुपर फास्ट ट्रेन 1662 किमी प्रवास 23 तास 30 मिनिटात पूर्ण करायची.

18

भारतीय रेल्वेच्या प्रमुख ट्रेनपैकी एक असलेल्या कोरोमंडल सुपरफास्ट एक्सप्रेसचा शुक्रवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. मालगाडीसह तीन रेल्वेंच्या या अपघातात आतापर्यंत 233 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.

28

कोरोमंडल एक्सप्रेस हावडातील शालीमार स्टेशन ते चेन्नई या दरम्यान धावते. पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडुतून ही रेल्वे जाते. ही ट्रेन भारतीय रेल्वेच्या सुरुवातीच्या सुपरफास्ट ट्रेनपैकी एक आहे.

38

कोलकात्याहून चेन्नईला जाणारे बहुतांश प्रवासी यानेच प्रवास करता. चेन्नई मेलच्या आधी कोरोमंडल एक्सप्रेस पोहोचत असल्याने वर्षभर ही रेल्वे प्रवाशांनी भरलेली असते.

48

कोरोमंडल एक्सप्रेसची सुरुवात 1977 मध्ये झाली होती. तेव्हा ही सुपर फास्ट ट्रेन 1662 किमी प्रवास 23 तास 30 मिनिटात पूर्ण करायची. त्यावेळी विजयवाडा, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरलाच ही ट्रेन थांबत असे. सध्या कोरोमंडल एक्सप्रेसचे थांबे वाढवल्याने वेळही साडेतीन तासाने वाढला होता.

58

हावडा चेन्नई ट्रॅक हा पूर्व किनारपट्टीवरचा मुख्य ट्रॅक आहे. आंध्र प्रदेशच्या विजयवाडापासून चेन्नईपर्यंत कोरोमंडल एक्सप्रेस नॉन स्टॉप चालते. 450 किमी अंतर सहा तासात पूर्ण करते.

68

कोरोमंडल एक्सप्रेसचा याआधीही अपघात झाला होता. फेब्रुवारी 2009 मध्ये भुवनेश्वरपासून 120 किमी अंतरावर असणाऱ्या जाझपूर क्योंझर रोडजवळ झालेल्या या अपघातात 16 जण ठार झाले होते तर 161 जण जखमी झाले होते. तेव्हा रेल्वे रुळावरून घसरली होती.

78

तामिळनाडुच्या चोल वंशाने ज्या ठिकाणी राज्य केलं त्याला तामिळमध्ये चोलमंडलम म्हटलं जातं. यावरूनच कोरोमंडल हा शब्द आला आहे. तसंच बंगालच्या खाडीला असलेल्या या पूर्व किनारपट्टीला कोरोमंडल कोस्ट असंही म्हटलं जातं. यामुळे रेल्वेला कोरोमंडल एक्सप्रेस असं नाव दिलं गेलं.

88

साउथ इस्टर्न रेल्वे विभागाच्या या ट्रेनचा सध्याचा प्रवास 1662 किमी अंतराचा असून 25 तास 30 मिनिटात हे अंतर पूर्ण होते. याचा वेग कमाल 130 किमी प्रतितास इतका असतो. चेन्नईला जात असताना या रेल्वेला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळेच किंग ऑफ साउथ इस्टर्न रेल्वे असंही कोरोमंडल एक्सप्रेसला म्हटलं जातं.

  • FIRST PUBLISHED :