NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / Piyush Jain IT Raid : तळघरातून, भिंतीतून आणि कपाटांमधून निघतायंत कॅश आणि सोनं! पाहा PHOTOS

Piyush Jain IT Raid : तळघरातून, भिंतीतून आणि कपाटांमधून निघतायंत कॅश आणि सोनं! पाहा PHOTOS

Operation Big Bazaar : उत्तर प्रदेशमध्ये कन्नौज आणि कानपूरमधील कथित परफ्यूम व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून आणि गोदामात छापेमारीत करोडोंची रोकड आणि सोनं जप्त करण्यात आलेलं आहे. यात पैशांचं घबाड इतकं मोठं होतं की छापा टाकण्यासाठी आलेल्या आयकर विभागाच्या पथकाचे अधिकारीही चक्रावून गेले. ऑपरेशन बिग बझारमध्ये जिकडे पाहावे तिकडे पैसे आणि सोने आढळले. पियुषच्या या काळ्या धंद्याच्या या खजिन्याची फोटोही थक्क करणारे आहेत. पाहा PHOTOS

15

GST इंटेलिजन्स, सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम्स (CBIC) आणि आयकर विभागाने अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर केलेल्या संयुक्त छाप्याला ऑपरेशन बिग बाजार असं नाव देण्यात आलं आहे. या छाप्यात आतापर्यंत 187 कोटींची रोकड, 250 किलो चांदी आणि सुमारे 25 किलोंचं सोनं सापडलेलं आहे.

25

आयकर विभागाच्या कारवाईत पियुष जैनच्या आनंदपुरी येथील घरात एक तळघर सापडलं आहे. त्या तळघरात रोख रक्कम आणि सोन्याच्या विटा सापडल्या आहेत. तळघरातील कारवाईचा व्हिडिओही समोर आला आहे. या तळघरात पियुष जैन याने काळा पैसा दडवल्याची शक्यता आहे.

35

पीयूष जैन यांच्या घरावर छापे टाकल्यानंतर इतकी रोकड सापडली की अधिकाऱ्यांना त्यांची मोजणी करणंही कठीण झालं. 24 डिसेंबरपासून सुरू झालेल्या कारवाईला दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. अजूनही कारवाई सुरूच आहे. पलंग, भिंती, कपाट आणि तळघरांमध्ये अफाट रोकड भरलेली होती. सर्वत्र नोटा आणि सोन्याच्या वीटा पाहून आयकर अधिकारीही अचंबित झाले.

45

डीजीजीआयने कन्नौज येथील पियुष जैन यांच्या कारखान्यावर छापा टाकला तेव्हा तेथे भूमिगत टाकी सापडली. या सीलबंद टाकीत 17 कोटींची रोकड आणि 23 किलो सोनं सापडलं आहे. सोन्यावर आंतरराष्ट्रीय चिन्ह आहे. छाप्यादरम्यान संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त होता. या कारवाईनंतर पियुष जैन याला अटक करण्यात आली.

55

अत्तर व्यापारी असलेल्या पियुष जैन यांच्या सर्व निवासस्थानांवर आणि गोदामांवर आयकराने छापे टाकल्यानंतर ही कारवाई चर्चेत आली आहे. आयटी आणि जीएसटी विभागाने केलेल्या कारवाईत 187 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. CGST कायद्याच्या कलम 67 अंतर्गत पियुष जैनला अटकही करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर पियुषला न्यायालयात हजर करण्यात आले, त्यात त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

  • FIRST PUBLISHED :