NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / पहा 'ब्राह्मोस'चं सामर्थ्य, हवाई आणि सागरी हल्ल्यानं शत्रूला करणार क्षणात उद्ध्वस्त

पहा 'ब्राह्मोस'चं सामर्थ्य, हवाई आणि सागरी हल्ल्यानं शत्रूला करणार क्षणात उद्ध्वस्त

Brahmos Missile Test : भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी, भारतीय वायुसेनेने नौदलाच्या बंद केलेल्या युद्धनौकेवर हे क्षेपणास्त्र डागलं. या क्षेपणास्त्राने पूर्ण तीव्रतेने आणि अचूकतेने लक्ष्यावर मारा केला आणि त्यामुळे जहाजाचं मोठं नुकसान झालं. लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, वॉरहेडशिवाय क्षेपणास्त्रामुळे रिकाम्या जहाजाचं नुकसान झालं. हे क्षेपणास्त्र सुमारे 3000 किमी प्रतितास वेगाने प्रवास करते आणि हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे याला रोखणं कठीण आहे.

15

सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. (Image-Twitter)

25

हा खरा हल्ला नव्हता. ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीसाठी, भारतीय वायुसेनेने नौदलातून बंद केलेल्या युद्धनौकेवर हे क्षेपणास्त्र डागलं. या क्षेपणास्त्राने पूर्ण तीव्रतेने आणि अचूकतेने लक्ष्यावर मारा केला आणि त्यामुळे जहाजाचं मोठं नुकसान झालं. (Image- Indian ANI)

35

वॉरहेड नसलेल्या क्षेपणास्त्रामुळे जहाजाचं नुकसान झालं आहे, असं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. हे क्षेपणास्त्र ताशी 3000 किमी वेगाने जातं आणि हवाई संरक्षण यंत्रणेला ते रोखणं कठीण आहे. या क्षेपणास्त्रात वॉरहेड्स वापरल्या गेल्या असत्या तर काय परिणाम झाला असता, याचा अंदाज लावला जाऊ शकतो. विध्वंसाचं चित्र आणखी वाईट असू शकलं असतं. (Image- ANI)

45

यापूर्वी 5 मार्च रोजी भारतीय नौदलानं ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीची हिंदी महासागरात यशस्वी चाचणी घेतली होती. क्षेपणास्त्राच्या प्रगत आवृत्तीची श्रेणी 350 किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे, तर मूलभूत आवृत्तीची श्रेणी 290 किमी होती. (Image- Indian Army)

55

ब्रह्मोस एअरोस्पेस हा एक इंडो-रशियन संयुक्त प्रयत्न आहे. याच्याद्वारे सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती केली जाते. ही क्षेपणास्त्रं पाणबुडी, जहाजं, विमानं किंवा लँड प्लॅटफॉर्मवरून सोडली जाऊ शकतात. ब्रह्मोस क्षेपणास्त्र मॅक 2.8 च्या वेगाने किंवा आवाजाच्या जवळपास तिप्पट वेगाने उडते. (Image- Indian Airforce)

  • FIRST PUBLISHED :