मनाली-लेह मार्ग, बारालाचा पास येथून छोट्या वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. हा रस्ता दुपारी एक वाजेपर्यंत खुला राहणार आहे.
सध्या ट्रक आणि दुचाकी वाहनांच्या वाहतुकीवर बंदी असणार आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फ दिसत आहे. त्यामुळे येथून जाणाऱ्या प्रवाशांसाठी हा एक खास अनुभव असतो.
या मार्गावर खाण्यापिण्याचे फारसे पर्याय नाहीत. येथून जाणार्या लोकांना लांब अंतरावर गेल्यावर काही पर्याय मिळतात, जिथं त्यांना खाणंपिणं शक्य होतं.
बर्फ हटवून बनवलेल्या या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून, या मार्गात बर्फाचं पाणीही साचलं आहे, त्यामुळे येथे रस्ता निसरडा झाला आहे. अशा परिस्थितीत येथून जाणाऱ्या लोकांना सावकाश वाहन चालवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ट्रक आणि दुचाकींच्या वाहतुकीसाठीही प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांत मार्गावरील परिस्थिती योग्य असेल, तेव्हा मूल्यांकनानंतर हालचाली सुरू केल्या जातील.
वाहतूक सुरू झाल्यानंतर आता बारालाचा दर्रातून (खिंड किंवा छोटा रस्ता) लोकांना छोट्या वाहनांनी जाता येणार आहे. वाटेत लोकांना खूप सुंदर दृश्यं पाहायला मिळतील.
प्रशासनाने वाहन चालकांना आवाहन केलंय की योग्य ठिकाणीच वाहने पार्क करावीत. जेणेकरून व्यवस्था चांगली राहील आणि वाहतूक कोंडी होणार नाही.