NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / देश / प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येतील राम मंदिर सज्ज; पहिल्यांदाच PHOTOS आले समोर

प्राणप्रतिष्ठापनेसाठी अयोध्येतील राम मंदिर सज्ज; पहिल्यांदाच PHOTOS आले समोर

अयोध्येत राम मंदिर बांधून कधी तयार होणार आणि रामलल्लांचं दर्शन कधी घेता येणार, अशी आतुरता प्रत्येक रामभक्ताला आहे. येत्या जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा नियोजित आहे. तत्पूर्वी पाहूया, राम मंदिर स्थापनेची काही छायाचित्र.

15

रामलल्लांच्या प्रतिष्ठापणा सोहळ्यासाठी अयोध्या विमानतळ, ज्याला मर्यादा पुरुषोत्तम श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळ असं म्हटलं जातं, ते देश-विदेशातील भक्तांच्या आगमनासाठी सज्ज झालं आहे.

25

हे दृश्य आहे राम मंदिराच्या गाभाऱ्याचं. याठिकाणी श्रीरामांचा जन्म झाला, असं मानलं जातं. राजस्थानहून आणलेल्या पांढऱ्या मार्बलने गाभाऱ्याच्या चहूबाजूंना आकर्षित नक्षीकाम करण्यात आलं आहे.

35

हा आहे 'परिक्रमा पथ'. राम मंदिरातील गाभाऱ्याच्या चारही बाजूंना एक मार्ग तयार करण्यात आला आहे. याद्वारे भक्त श्रीरामांचं परिक्रमण करू शकतील. म्हणूनच या मार्गाला परिक्रमा पथ असं नाव दिलंय.

45

राम मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी तीन मार्ग असतील. त्यापैकीच हा एक मार्ग. दगडांनी उभारलेल्या या मार्गावर अतिशय सुरेख असं नक्षीकाम करण्यात आलं आहे.

55

राम मंदिर बांधकामात वापरलं जाणारं हे सागवानाचं लाकूड महाराष्ट्रातून आणण्यात आलं आहे. 1000 वर्ष टिकणाऱ्या या लाकडामुळे राम मंदिरही वर्षानुवर्षे भक्कम स्थितीत राहील.

  • FIRST PUBLISHED :