12 व्या शतकातील ऐतिहासिक जगन्नाथाचं मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. भाविकांनी आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया कळवाव्यात ज्यामुळे कारभारात सुधारणा करणं सोपं जाईल, असं आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलं आहे.

भाविक जागोजागी लावलेले क्यूआर कोड स्कॅन करून आपली प्रतिक्रिया नोंदवू शकतात. त्याचप्रमाणे पोलीस सेवा केंद्रात असणारे फॉर्मदेखील भरू शकतात, अशी माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे.
भाविकांनी आपला प्रतिसाद नोंदवावा आणि इतर प्रवाशांना अधिकाधिक चांगली सुविधा मिळण्यासाठी आम्हाला मदत करावी, असं आवाहन पोलिसांनी ट्विटरवरून केलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर 24 एप्रिलपासून हे मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आलं होतं.
सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
शनिवारी आणि रविवारी सॅनिटायझेशनसाठी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या धार्मिक सणांदिवशीदेखील मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. गर्दी टाळण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे.
मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांना लसीकरण झाल्याचे सर्टिफिकेट किंवा कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सादर करावा लागणार आहे.