गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटाचे चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस बंद राहणार आहे.
घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.
पावसाळ्याच्या आधी परशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्या पार्श्वूमीवर प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
दरम्यानच्या काळात या मार्गावरील वाहतूक चिरणी आंबडस मार्गे वळवली जाणार आहे. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी ही माहिती महतत्वाची आहे.
रस्ता बंद करण्याबाबत रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेश आहेत.