NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मुंबई / लाँग विकेंडने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्राफिक जाम, 5-6 किमी वाहनांच्या रांगा

लाँग विकेंडने मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्राफिक जाम, 5-6 किमी वाहनांच्या रांगा

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सलग दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी झाली आहे. खालापूर टोल नाक्यापासून पाच ते सहा किमी लांब रांगा लागल्या आहेत.

15

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर कालपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने खंडाळा घाट परिसरात वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

25

शनिवार रविवार व सोमवार असे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने खाजगी वाहनांमधून पर्यटनासाठी घराबाहेर पडल्याने काल सकाळपासून मुंबई पुणे एक्सप्रेस वे जाम झाला आहे.

35

वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी खंडाळा बोगदा परिसरात महामार्ग पोलिसांनी दहा दहा मिनिटांचे ब्लॉक घेत मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने थांबवत मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहने सर्व सहा लेन वरून सोडली जात आहेत.

45

मुंबई पुणे लेनवर खालापूर टोलनाक्यापासून खंडाळ्यापर्यंत प्रवासी वाहनांच्या रांगाच रांगा पाहायला मिळत आहेत. या वाहतूककोंडीत सापडल्याने वाहन चालकांचे व वाहनांमधील प्रवाश्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

55

खालापूर टोल नाक्यापासून पाच ते सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी वाहतूक कोंडी आहे.

  • FIRST PUBLISHED :