भविष्यात अधिक निधी मिळविण्यासाठी लोक अनेक ठिकाणी गुंतवणूक करण्याची तयारी करतात. म्युच्युअल फंड हा कमी जोखीम आणि दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी चांगला पर्याय असू शकतो. क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका 'या' 3 चुका, होऊ शकते नुकसान
2023 वर्षाच्या सुरूवातीस, जर तुम्ही देखील म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि भविष्यात तुम्हाला आणखी निधी हवा असेल तर तुम्हाला सिस्टमॅटिक योजना आखावी लागेल.
मोठा निधी उभारण्यासाठी SIP हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्हाला 5 वर्षात 50 लाखांची रक्कम हवी असल्यास, तुम्हाला किती पैसे गुंतवावे लागतील आणि तुम्हाला किती परतावा मिळायला हवा याविषयी आपण जाणून घेऊ. तसेच, तुम्ही कोणत्या प्रकारच्या फंडात पैसे गुंतवू शकता हे देखील जाणून घेऊया. RBI ठरवणार बँकांची गाइडलाइन, लोन पॅनल्टीवर देणार विशेष सूचना
एग्रेसिव्ह गुंतवणूकदार, जे अधिक जोखीम घेऊ शकतात आणि फक्त 5 वर्षांत 50 लाख रुपयांचा निधी तयार करू इच्छितात, तर तुम्ही फ्लेक्सी कॅप फंड किंवा मल्टी कॅप फंडात गुंतवणूक करावी. तज्ञांचे मत आहे की, गुंतवणूकदारांना या फंडांमध्ये 15% परतावा मिळू शकतो आणि गुंतवणूकदारांना SIP द्वारे दरमहा 55,750 रुपये गुंतवावे लागतील.
HDFC फ्लेक्सी कॅप फंडाने एका वर्षात 19.98 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे क्वांट फ्लेक्सिकॅप फंडने 13.64% परतावा दिलाय. ICICI प्रुडेन्शियल फ्लेक्सिकॅप फंडने 11.20% परतावा दिलाय. निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंडाने सरासरी 15.90% परतावा दिलाय. याशिवाय, क्वांट मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के, कोटक मल्टीकॅप फंडाने 13.16 टक्के आणि एचडीएफसी मल्टीकॅप फंडाने 12.37 टक्के परतावा दिला आहे.
तुम्ही कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्या फंडाची माहिती घ्यावी. तसेच, म्युच्युअल फंडांची तुलना देखील केली पाहिजे. रिस्क आणि रिटर्नच्या आधारावर तुम्ही कोणत्याही फंडात तुमच्या गुंतवणुकीची योजना करू शकता.