NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Richest People : जगातील 10 सर्वात श्रीमंत तरुण, 40 वर्षांपेक्षा कमी वयात कमावताय एवढा पैसा!

Richest People : जगातील 10 सर्वात श्रीमंत तरुण, 40 वर्षांपेक्षा कमी वयात कमावताय एवढा पैसा!

Richest People : 40 वर्षांखालील या 10 अब्जाधीशांपैकी बहुतेक सेल्फ मेड बिझनेस टायकून आहेत. तर काही लोकांना ही संपत्ती वारशाने मिळाली आहे. या लोकांची एकूण संपत्ती 262.7 अब्ज डॉलर इतकी आहे, जी न्यूझीलंड आणि पोर्तुगाल सारख्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

111

संपूर्ण जगाची संपत्ती मूठभर लोकांकडे आहे. देश-विदेशातील अब्जाधीशांकडे एवढा पैसा आहे की तो प्रत्येक व्यक्तीमध्ये वाटला तर जगातील प्रत्येकजण नक्कीच करोडपती होईल. जगातील 1000 सर्वात श्रीमंत लोकांपैकी 22 अब्जाधीश उद्योगपती असे आहेत ज्यांचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे, परंतु त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती आहे.

211

40 वर्षांखालील अब्जाधीशांच्या या यादीत पहिले नाव मेटाचे संस्थापक मार्क झुकरबर्गचे आहे. ज्यांची संपत्ती 97 अब्ज डॉलर्स म्हणजेच 80 ट्रिलियन रुपये आहे. जागतिक संपत्ती क्रमवारीत झुकेरबर्ग 11 व्या क्रमांकावर आहे.

311

यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रियाचे 31 वर्षीय Mark Mateschitz आहे, ज्यांची एकूण संपत्ती 39.3 अब्ज अमेरिकन डॉलर आहे.

411

अमेरिकेत राहणारे 36 वर्षीय Lukas Walton यांची संपत्ती 22.3 बिलियन डॉलर आहे. वॉल-मार्ट हा त्याच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. जागतिक क्रमवारीत त्याचे 69 वे स्थान आहे.

511

तर 39 वर्षीय Dustin Moskovitz यांची एकूण संपत्ती 12.2 बिलियन अमेरिकी डॉलर आहे आणि ते जागतिक संपत्ती क्रमवारीत 141 व्या क्रमांकावर आहेत.

611

सौदी अरेबियाचे रहिवासी असलेले 38 वर्षीय Pavel Durov यांची संपत्ती 11.5 बिलियन अमेरिकी डॉलर आहे. त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे मेसेजिंग अॅप. पॉवेल ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये 147 व्या स्थानावर आहे.

711

चीनच्या Chris Xuने वयाच्या 39 व्या वर्षी ई-कॉमर्स व्यवसायातून 10.5 बिलियन अमेरिकी डॉलर संपत्तीची कमाई केली. Xu ला ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये 168 वे स्थान मिळाले आहे.

811

अमेरिकेचे रहिवासी असलेले 39 वर्षीय Nathan Blecharczyk यांची एकूण संपत्ती 7.7 बिलियन अमेरिकी डॉलर आहे. ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये हा तरुण 279 व्या क्रमांकावर आहे.

911

इस्रायलच्या 38 वर्षीय Dmitri Bukhman यांच्याकडे 7 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांच्या कमाईचा मुख्य स्त्रोत ऑनलाइन गेम आहे. ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये ते 327 व्या स्थानावर आहे.

1011

आयर्लंडचे 34 वर्षीय रहिवासी Patrick Collison यांची नेटवर्थ 5.5 बिलियन डॉलर आहे. पेमेंट सॉफ्टवेअरमधून कमाई करणारा हा तरुण ग्लोबल वेल्थ रँकिंगमध्ये 479 व्या क्रमांकावर आहे.

1111

आयर्लंडच्या John Collison चीही संपत्ती 5.5 बिलियन डॉलर अब्ज आहे. परंतु वयाने कॉलिसनपेक्षा 2 वर्षांनी लहान आहेत.

  • FIRST PUBLISHED :