NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / हा आहे जगातील सर्वात महागडा मासा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

हा आहे जगातील सर्वात महागडा मासा! किंमत पाहून तुम्हीही व्हाल थक्क

World Most Expensive Fish : जगात महागड्या वस्तूंची कमतरता नाही. मात्र प्रश्न असाय की, त्याला कोणी खरेदी करणाराच भेटत नाही. फक्त श्रीमंतीत जगणारे लोकच महागडे शौक पूर्ण करू शकतात. खाण्यापिण्याशी संबंधित अनेक महागड्या दुर्मिळ गोष्टींबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण जगातील सर्वात महागडा मासा कोणता आहे, तो कुठे मिळतो आणि त्याची किंमत किती आहे? हे तुम्हाला माहितीये का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत.

15

ब्लूफिन टूना हा जगातील सर्वात महाग मासा म्हणून ओळखला जातो. हा मासा ट्यूना प्रजातींपैकी सर्वात मोठा आहे. त्याचा पाण्यात पोहण्याचा वेग अतिशय वेगवान आहे.

25

हा मासा 3 मीटर लांब आणि 250 किलो वजनाचा असू शकतो. तो इतर लहान माशांना आपला शिकार बनवतो. हा मासा उष्ण रक्ताचा असतो. प्रोटीन आणि ओमेगा-3 ने भरपूर असलेला हा मासा औषधी बनवण्यासाठीही वापरला जातो.

35

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, जपानमधील टोकियोच्या टोयोसू फिश मार्केटमध्ये जायंट ब्लूफिन टूना खरेदी करण्यासाठी 273,000 डॉलर म्हणजेच 2 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली होती. या ब्लूफिन ट्यूनाचे वजन 212 किलो होते.

45

ब्लूफिन टूना त्याच्या वेगासाठी आणि समुद्रात खोलवर जाण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. या माशाचे वय सुमारे 40 वर्षे असते.

55

नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याने ब्लूफिन ट्यूनाच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे. पकडल्यास तुरुंगवास तसेच दंडही होऊ शकतो.

  • FIRST PUBLISHED :