Why Gold Is So Expensive:सोन्याच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. सध्या सोनं हे 60 हजारांच्या वर गेलंय. सोनं कितीही महाग झालं तरी त्याची क्रेझ काही कमी होत नाही. लोक त्यांच्या स्थितीनुसार सोनं खरेदी करतात. अशा वेळी मनात प्रश्न येत असेल की, सोनं एवढं महाग का आहे?
सोन्याचा वापर प्राचीन काळापासून होतोय. जुन्या काळी राजे-सम्राटांच्या मुकुट आणि दागिन्यांपासून ते नाण्यांपर्यंत फक्त सोन्याचेच असायचे असायचे. आजही लोकांची सोन्याबद्दलची आवड कमी झालेली नाही. विशेषत: महिलांना सोन्याचे दागिने खरेदी करण्याची खूप हौस असते. सोने हा जगातील सर्वाधिक पसंतीच्या धातूंपैकी एक आहे. परंतु,ते खूप महाग आहे. सोन्याच्या किंमतीमागे अनेक कारणे आहेत. चला जाणून घेऊया.
दुर्मिळ किंवा निसर्गात कमी प्रमाणात आढळणाऱ्या गोष्टी बहुतेक महाग असतात. सोने हे देखील एक अतिशय उपयुक्त धातू आहे, तसेच ते निसर्गातही फार कमी प्रमाणात आढळते. पण, त्याची मागणी जगभरात खूप आहे. यामुळे ते महाग आहे.
सोने निसर्गात स्वतंत्र आणि संयुक्त दोन्ही स्वरूपात आढळते. सोन्याच्या धातूपासून शुद्ध सोने मिळवण्याची प्रक्रिया खूप महाग आहे. त्यामुळे सोने खूप महाग झालेय. तुम्हाला कदाचित माहित नसेल की समुद्रातही सोने सापडते. पण, समुद्रातून सोने काढण्याची प्रक्रिया खूप महाग आहे. अशाप्रकारे, त्याची खाणकामाची प्रक्रिया महाग असते. यामुळेच सोनं हे खूप महाग विकलं जातं.
याशिवाय सोने हा पिवळ्या रंगाचा चमकदार आणि अतिशय सुंदर धातू आहे. सुंदर गोष्टींची किंमत नेहमीच जास्त असते. अशाप्रकारे, सोन्याची चमक आणि सौंदर्य हे देखील ते महाग असण्याचं एक मोठं कारण आहे.
सोन्याला गंज चढत नाही. सोन्यामध्ये लोखंडासारख्या इतर धातूंप्रमाणे ऑक्सिडायझेशन करण्याची प्रवृत्ती नसते. फॅशन, डेकोरेशनपासून ते इंडस्ट्रियल कामातही त्याचा वापर होतो.
सोन्याची किंमत कोणतीही संस्था ठरवत नाही, तर ती त्याच्या खाणकाम आणि शुद्धीकरणाच्या खर्चावर अवलंबून असते. सोन्यावर हवामानाचा कोणताही परिणाम होत नाही. त्याचा हा गुण इतर धातूंपेक्षा वेगळा बनवतो. सोनं कोणत्याही ऋतूत चांगले राहू शकते.