उन्हाळ्याच्या दिवसात एटीएममधून पैसे काढायला गेलो तर तिथे आपल्याला खूप छान वाटतं. कारण, बाहेरच्या कडक उन्हापेक्षा तिथली एसीची थंड हवा आपल्याला आनंद देते. तुम्हाला वाटत असेल की, ही एसी तुमच्यासाठी बसवलेली असते.
पण खरं म्हणजे लोकांना आनंद देण्यासाठी हा एसी बसवलेला नसतो. तुम्ही नेहमीच पाहिलं असेल की, स्मार्टफोन जास्त वेळ वापरला किंवा उन्हात वापरला तर तो गरम होतो.
एटीएम मशीनच्या बाबतीतही असेच घडते. कारण हे सुद्धा एक मशिन आहे आणि लोकांची सोय लक्षात घेऊन ATM 24 तास चालू ठेवले जाते. अशा परिस्थितीत मशीन गरम होऊन खराब होण्याची शक्यता असते.
त्यामुळे एटीएम मशीन थंड ठेवण्यासाठी आणि सतत सर्व्हिस देण्यासाठी त्या केबिनमध्ये एसी बसवण्यात येतो. अनेक ठिकाणी मशिन्सची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी जास्त एसीही बसवले जातात.
भारतातील बहुतेक ATM सेंटरमध्ये दोन एअर कंडिशनर आहेत. एक स्टँडबाय म्हणून ठेवले आहे आणि दोन्ही अल्टरनेट वापरले जातात. जेणेकरून एटीएम मशीनला 24 तास कूलिंग मिळू शकेल.