NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Jagat Seth: कोण होते जगत सेठ? इंग्रजही त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज, पण एक चूक आणि झाले कंगाल

Jagat Seth: कोण होते जगत सेठ? इंग्रजही त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज, पण एक चूक आणि झाले कंगाल

जगत सेठ हे नाव नाही तर पदवी आहे. जी फतेह चंद यांना मुगल बादशाह मुहम्मद शाह यांनी 1723 मध्ये दिली होती. यानंतर हे पूर्ण कुटुंब 'जगत सेठ घराणं' या नावाने प्रसिद्ध झालं.

15

मुंबई, 28 जून : ऐकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं. तुम्ही हे नक्कीच ऐकलं असेल. पण कोणत्या श्रीमंत लोकांमुळे भारताला हा दर्जा मिळाला होता? हे सोनं लूटण्यासाठी इंग्रजांना भारतात यावं लागलं. आज आपण याच लोकांमधील जगत सेठ यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. ज्यांच्याजवळ एवढा पैसा होता की, इंग्रजही त्यांच्याकडून उधार घेत असतं. इंग्रज शासक बनून नाही तर व्यापारी बनून त्यांच्याकडून कर्ज घेत असतं.

25

खरंतर 'जगत सेठ' हे नाव नसून एक उपाधी आहे. जे 1723 मध्ये मुघल सम्राट मुहम्मद शाह यांनी फतेहचंद यांना दिली होती. यानंतर संपूर्ण कुटुंब 'जगतशेठ घराणा' म्हणून प्रसिद्ध झाले. या घराण्याचे संस्थापक सेठ माणिक चंद मानले जातात. माणिकचंद हे नवाब मुर्शिद कुली खानचे खजिनदार तर होतेच. पण प्रांताचे महसूलही त्याच्याकडे जमा होत असतं.

35

या दोघांनी मिळून बंगालची नवी राजधानी मुर्शिदाबादची स्थापना केली. एक कोटी तीस लाखांऐवजी त्यांनी औरंगजेबाला दोन कोटी कर पाठवला होता. माणिकचंद यांच्यानंतर कुटुंबाची धुरा फतेहचंद यांच्या हातात आली, ज्यांच्या काळात कुटुंब खूप उंचावर गेले.

45

जगतसेठांचे एवढे श्रीमंत घराणे आज कोणालाच का माहिती नाही? : जगतसेठ घराण्याबद्दल असे म्हटले जात होते की या घराण्याला हवे असेल तर ते सोन्या-चांदीची भिंत करून गंगा प्रवाह थांबवू शकतात. फतेहचंदच्या काळात या कुटुंबाने सर्वाधिक संपत्ती कमावली. त्यावेळी त्यांची संपत्ती सुमारे 10,000,000 पौंड होती, जी आज सुमारे 1000 अब्ज पौंड असेल. ब्रिटीश सरकारच्या कागदपत्रांनुसार, त्याच्याकडे इंग्लंडमधील सर्व बँकांच्या एकत्रित रकमेपेक्षा जास्त पैसा होता. काही रिपोर्ट्सनुसार 1720 च्या दशकात ब्रिटिश अर्थव्यवस्था सेठच्या संपत्तीपेक्षा कमी होती. पण सूर्य हा कधीना कधी मावळतोच.

55

या कुटुंबाचा अंत होण्याचे कारण म्हणजे इंग्रजांनी दिलेला विश्वासघात. जगतसेठने इंग्रजांना खूप मोठे कर्ज दिले होते, पण नंतर इंग्रजांनी जगतसेठचे ईस्ट इंडिया कंपनीवर कोणतेही कर्ज असल्याचे नाकारले. या कुटुंबासाठी हा मोठा धक्का होता. इसवी सन 1912 पर्यंत या कुटुंबातील सेठांना जगतसेठ या उपाधीने इंग्रजांकडून काही प्रमाणात पेन्शन मिळत राहिली. मात्र नंतर ही पेन्शनही बंद झाली. एकेकाळी भारतातील मोठे मोठे निर्णय या कुटुंबाच्या संमतीशिवाय घेतले जात नव्हते. आजच्या काळात त्यांना कोणी ओळखतही नाही.

  • FIRST PUBLISHED :