NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर

FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर

Bank FD : तुम्ही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करण्याचा विचार करत असाल आणि कोणती बँक FD वर जास्त व्याज देत आहे हे जाणून घ्यायचे असेल तर जास्त शोधायची गरज नाही. देशातील आघाडीच्या सरकारी आणि प्रायव्हेट बँकांमध्ये एफडीवर किती व्याजदर उपलब्ध आहेत ते आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

18

रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिलमध्ये व्याजदरात सातत्याने होणाऱ्या वाढीला ब्रेक लावला आणि रेपो दरात वाढ केली नाही. यानंतर काही बँकांनी फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात सुधारणा केली आहे. काही बँकांनी आरबीआयच्या धोरणाचे पालन केले असून व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही.

28

अशा वेळी कोणती बँक FD वर सर्वाधिक व्याज देत आहे हे जाणून घेऊया. कोणकोणत्या बँकांनी किती व्याजदर वाढवले आहेत हे सविस्तर पाहूया.

38

पंजाब नॅशनल बँकेने नियमित नागरिक, ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर व्याजदर सुधारित केले आहेत. PNB ने ठराविक मुदतीसाठी निवडक FD चे व्याजदर वाढवले ​​आहेत आणि ठराविक मुदतीच्या FD चे देट कमी केले आहेत. 444 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या FD वर, बँकेने नियमित नागरिकांसाठी व्याजदर 6.80% वरून 7.25% पर्यंत वाढवला आहे. यासोबतच, 666 दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवरील व्याज 7.25% वरून 7.05% पर्यंत कमी केले आहे. ही बँक 7.25% उच्च व्याज दर देतेय.

48

बँक ऑफ बडोदाने 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली आहे. ही बँक सर्वसामान्य नागरिकांना एफडीवर 7.25 टक्के व्याज देत आहे. त्याच वेळी ज्येष्ठ नागरिक 7.75 टक्के व्याज मिळवू शकतात. फिक्स्ड डिपॉझिटवरील सुधारित व्याजदर 12 मे पासून लागू आहेत.

58

प्रायव्हेट सेक्टरच्या कोटक महिंद्रा बँकेने एक-मुदतीच्या एफडीच्या व्याजदरात 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँक फिक्स्ड डिपॉझिटवर सामान्य नागरिकांसाठी 2.75% ते 7.20% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25% ते 7.70% दरम्यान व्याज दर देते. 390 दिवस ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7.20% व्याजदर आहे. 11 मे 2023 पासून 2 कोटी रुपयांपेक्षा कमी डिपॉझिटवर सुधारित व्याज दर लागू आहे.

68

स्टेट बँक ऑफ इंडिया 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर सर्वसामान्य नागरिकांसाठी 3% ते 7.10% (अमृत कलश ठेवीसह) दरम्यान व्याज दर देत आहे. SBI च्या अमृत कलश FD योजनेवर 400 दिवसांच्या कालावधीसाठी 7.10% दराने व्याज मिळतेय. ही योजना 30 जून 2023 पर्यंत वैध आहे.

78

एचडीएफसी बँक 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी 3% ते 7.10% दरम्यान व्याज देतेय. यामध्ये, 15 महिने ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक 7.10% व्याजदर उपलब्ध आहे.

88

प्रायव्हेट सेक्टरच्या ICICI बँक देखील सामान्य नागरिकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवर 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 3% ते 7.10% पर्यंत व्याजदर देतेय. यामध्ये, 15 महिन्यांपासून ते 18 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर सर्वाधिक 7.10% व्याजदर आहे.

  • FIRST PUBLISHED :