NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / कमीत कमी किती दिवसांसाठी करता येते FD? काय आहेत नियम? घ्या जाणून

कमीत कमी किती दिवसांसाठी करता येते FD? काय आहेत नियम? घ्या जाणून

एफडीशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत, जे बँकांवर अवलंबून आहेत. सर्वसाधारणपणे सर्व बँकांचे किमान आणि कमाल कालावधी किंवा जमा रकमेबाबत समान नियम असतात.

15

फिक्स्ड डिपॉझिट हा सर्वात सोपा आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानला जातो. यामध्ये, गुंतवणूकदाराला ठराविक अंतराने निश्चित परतावा मिळण्याची हमी असते. तसेच बाजारातील चढ-उताराचाही त्यावर कोणताही परिणाम होत नाही. एफडीशी संबंधित वेगवेगळे नियम आहेत, जे बँकांवर अवलंबून असतात. सर्वसाधारणपणे सर्व बँकांचे किमान आणि कमाल कालावधी किंवा ठेव रकमेबाबत समान नियम असतात.

25

किती काळासाठी करता येते फिक्स्ड डिपॉझिट? बँकेत किमान 15 दिवस फिक्स्ड डिपॉझिट करता येतं. बँक ऑफ बडोदाने 1 कोटीपर्यंतच्या एफडीसाठी किमान 15 दिवस आणि 1 कोटींवरील एफडीसाठी 7 दिवसांचा कालावधी सेट केला आहे. त्याचप्रमाणे, SBI मध्ये FD चा किमान कालावधी 15 दिवसांचा आहे.

35

FD च्या जास्तीत जास्त वेळेच्या मर्यादेबद्दल बोललो तर सामान्यतः बँका FD ला 120 महिने म्हणजेच 10 वर्षांपर्यंत बँकेत ठेवण्याची परवानगी देतात. यामध्येही काही अटी असतात. काही विशेष परिस्थितींमध्ये, हा कालावधी देखील वाढवला जाऊ शकतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत तो 20 वर्षांपेक्षा जास्त नसावा.

45

बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात कोणताही धोका नाही. FD मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर देखील सामान्यपेक्षा जास्त आहे.

55

एफडीचा कालावधी संपल्यानंतर, गुंतवणूकदाराला व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळते.

  • FIRST PUBLISHED :