NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / एसीसोबत सीलिंग फॅन लावला पाहिजे का? यामुळे थंड हवा बाहेर जाते का?

एसीसोबत सीलिंग फॅन लावला पाहिजे का? यामुळे थंड हवा बाहेर जाते का?

AC with Fan:कडक उन्हाळा सुरु झाला आहे. उकाड्याने लोक हैराण झाले आहेत. अशा वेळी एसीचा वापरही मोठ्या प्रमाणात सुरु झालाय. अनेक घरांत किंवा ऑफिसमध्ये एसी बसवले जातात मात्र येथे सीलिंग फॅनही असतात. अशा वेळी तुम्हाला प्रश्न पडत असेल की, एसी लावल्यावर सीलिंग फॅन लावला तर चालतो का? याच प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेणार आहोत.

15

अनेक लोक मानतात की, एअर कंडिशनरसोबत सीलिंग फॅन्सचा वापर करू नये. कारण, छतावरील पंखे गरम हवा खाली फेकतात. हे काही प्रमाणात खरे आहे. ज्या ठिकाणी पंखे छताच्या जवळ आहेत आणि छतही खूप खाली आहे तिथं असं होऊ शकतं.

25

परंतु, बिजली बचाओ ब्लॉगनुसार, एसीसह सीलिंग फॅन वापरल्यावर पंखा रुममध्ये वारा निर्माण करतो, ज्यामुळे खोलीत उपस्थित लोकांना थंड आणि आरामदायक वाटते.

35

कारण, सीलिंग फॅन स्वतःच उपलब्ध हवा थंड तर करत नाही. परंतु, सर्वसाधारणपणे ज्या ठिकाणी पंखे असतात तिथे हवा खेळती राहते. यासोबतच ते संपूर्ण खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात थंड हवा पोहोचवण्याचे काम करतात.

45

छतावरील पंखे थंड हवेला एकाच ठिकाणी राहण्यापासून रोखतात आणि खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरवतात. अशा परिस्थितीत एसीला जास्त काम करण्याची गरज नसते आणि खोली लवकर थंड होते. तसेच, थंड हवा खोलीच्या बाहेर जाऊ नये म्हणून सर्व खिडक्या आणि दरवाजे काळजीपूर्वक बंद करा.

55

एवढेच नाही तर छतावरील पंख्यांचा वापर करून विजेचीही मोठी बचत होते. Energy.gov नुसार, तुम्ही AC सह सीलिंग फॅन वापरत असल्यास, ते तुम्हाला थर्मोस्टॅट सेटिंग 2-4 डिग्रीपर्यंत वाढवण्यास मदत करते. त्यामुळे विजेची बचत होते. तसेच, आरामात कोणताही परिणाम होत नाही.

  • FIRST PUBLISHED :