NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / देशाच्या 'या' वेगवेगळ्या रुटवर धावतेय वंदे भारत ट्रेन, पाहा तुम्हीही प्रवास करु शकता का?

देशाच्या 'या' वेगवेगळ्या रुटवर धावतेय वंदे भारत ट्रेन, पाहा तुम्हीही प्रवास करु शकता का?

सद्याच्या काळात वंदे भारत ट्रेन देशाच्या वेगवेगळ्या भागात धावत आहे. सरकारने येणाऱ्या काळात आणखी 31 वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी केली आहे. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत एकूण 75 वंदे भारत ट्रेन चालवण्याचे लक्ष सरकारने ठेवले आहे.

17

Vande Bharat Train : देशातील सर्वात वेगवान असणारी सेमी हाय स्पीड ट्रेन वंदे भारत रेल्वे प्रवाशांमध्ये खूप प्रसिद्ध झाली आहे. केंद्र सरकारने सर्वात पहिल्यांदा वाराणसीहून नवीन दिल्लीमध्ये 2019 मध्ये ही ट्रेन चालवली होती. सध्याच्या काळात भारताच्या विविध भागांमध्ये ही ट्रेन चालवली जातेय. पाहूया देशभरातील कोणत्या रुटवर ही ट्रेन धावतेय. पाहा तुमच्या रुटवरही ही ट्रेन धावतेय का?

27

नवी दिल्ली ते वाराणसी या रुटवर देशातील सर्वात पहिली ट्रेन सुरु झाली होती. ट्रेन नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरुन सकाळी 6 वाजता निघते आणि दुपारी 2 वाजता वाराणसीला पोहोचते. नवी दिल्लीपासून वाराणसीचे अंतर 759 किमी आहे. दुसरा रुट नवी दिल्ली ते माता वैष्णो देवी कटरा आहे. ही ट्रेन मंगळवार वगळता आठवड्यातून 6 दिवस चालते. नवी दिल्लीतून सकाळी 6 वाजता निघते आणि दुपारी 2 वाजता माता वैष्णो देवीला पोहोचते.

37

गांधीनगर ते मुंबई हा वंदे भारत एक्सप्रेसचा तिसरा रुट आहे. रविवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही ट्रेन चालते. मुंबई सेंट्रलवरुन सकाळी 6 वाजता ही ट्रेन निघते तर दुपारी 12.55 ला गांधीनगरला पोहोचते. नवी दिल्ली ते अंब अंदौरा हा वंदे भारत एक्सप्रेसचा चौथा रुट आहे. ही ट्रेन शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस चालते. नवी दिल्लीतून सकाळी 5.50 ला ट्रेन निघते. सकाळी 11.05 वाजता अदौराला पोहोचते.

47

चेन्नई ते मैसूर हा या ट्रेनचा पाचवा रुट आहे. बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन चालते. नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसचा सहावा रुट आहे. शनिवार वगळता आठवड्यातून 6 दिवस ही ट्रेन चालते.

57

हावडा ते न्यू जलपाईगुडी हा रेल्वेचा सातवा रुट आहे. बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस ही ट्रेन चालते. तर सिंकदराबाद ते विशाखापट्टनम हा रेल्वेचा आठवा रुट आहे. रविवार वगळता आठवड्याच्या 6 दिवस ही ट्रेन धावते.

67

मुंबई ते सोलापूर हा वंदे भारत एक्सप्रेसचा 9 वा रुट आहे. बुधवार सोडून आठवड्यातून 6 दिवस ही ट्रेन धावते. मुंबई ते शिर्डी हा या ट्रेनचा दहावा रुट आहे. फक्त मंगळवारी ही ट्रेन या रुटवरुन धावत नाही. दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन ते कमलापती रेल्वे स्टेशनपर्यंत रेल्वेचा 11 वा रुट असतो. ही ट्रेन शनिवार वगळता आठवडाभर धावते.

77

चेन्नई ते कोयंबटूर हा या रेल्वेचा 13 रुट आहे. फक्त बुधवारी या रुटवरुन ट्रेन धावत नाही. तर अजमेर ते दिल्ली हा या वंदे भारत ट्रेनचा 14 वा रुट आहे. फक्त बुधवारी या रुटवरुन ट्रेन धावत नाही.

  • FIRST PUBLISHED :