आता तुमचा आधारशी कोणता मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी लिंक झाला आहे, ते तुम्ही सहज व्हेरिफाय करु शकाल. UIDAI ने नागरिकांसाठी एक नवीन सुविधा सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये रहिवासी त्यांचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफिकेशन करु शकतील.
UIDAI च्या निदर्शनास आलं होतं की आधार कार्ड धारकांना त्यांचा कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक केला आहे हे माहिती नसतं. अशा वेळी आधारवर येणारा ओटीपी अन्य कोणत्याही मोबाइल क्रमांकावर तर जात नाही ना, अशी भीती नागरिकांना वाटतेय. पण UIDAI च्या या सुविधेमुळे आधार धारक आपला कोणता मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे हे सहज तपासू शकणार आहेत.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्हेरिफाय करण्यासाठी, एखाद्याला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in किंवा mAadhaar अॅपला भेट द्यावी लागेल आणि व्हेरिफायि ईमेल/मोबाइल नंबर वर क्लिक करा.
याद्वारे नागरिकांना त्यांचा आधारशी कोणता मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी लिंक आहे हे कळू शकेल. आधारशी इतर कोणताही नंबर जोडला असल्यास तो सहज शोधता येईल आणि आधार कार्डधारक त्यांना नंबर अपडेटही करता येईल.
जर मोबाईल पहिलेच व्हेरिफाइड असेल तर मॅसेज येईल की,जो मोबाईल नंबर एंटर केला आहे तो आमच्या रेकॉर्डमध्ये पहिलेच व्हेरिफाय आहे.
एखाद्या नागरिकाला आधार नोंदणी करताना त्यांनी कोणता मोबाईल नंबर दिला आहे हे माहीत नसेल, तर ती व्यक्ती मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक टाकून Myadhaar पोर्टल किंवा mAadhaar अॅपवर जाऊन आणि Verify Aadhaar वर जाऊन व्हेरिफाय करु शकते.