NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त परतावा

ज्येष्ठ नागरिकांसाठी गुडन्यूज! या 10 बँकांमध्ये FD वर मिळतोय जबरदस्त परतावा

रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर बँकांनी एफडीचे दरही वाढवले ​​आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी, बहुतेक बँका सामान्य लोकांपेक्षा जास्त दराने व्याज देतात.

111

आरबीआयने व्याजदरात वाढ केल्यामुळे कर्ज घेणाऱ्यांना तोटा सहन करावा लागतोय. मात्र एफडी गुंतवणूकदारांना त्याचा पुरेपूर फायदा होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना FD वर भरघोस व्याजाचा सर्वाधिक लाभ मिळतोय. रेपो रेटमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक बँकांनी एफडीवरील व्याजदर वाढवले आहेत. आज आपण सीनियर सिटीझन्ससाठी कोणत्या बँकेंते एफडी करणे बेस्ट आहे याविषयी माहिती घेणार आहोत.

211

Yes Bank : ही खाजगी क्षेत्रातील बँक 35 महिन्यांच्या कालावधीसह FD वर 8.25% दराने व्याज देतेय. बँकेचे हे नवीन दर 12 जानेवारी 2023 पासून लागू झाले आहेत. अचानक पैशांची गरज भासली तर 'हा' पर्याय आहे बेस्ट, सहज मिळेल कर्ज

311

AU Small Finance Bank: ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 24 महिने ते 45 महिन्यांच्या FD वर 8.25% दराने व्याज देत आहे. हे नवे दर 1 फेब्रुवारीपासूनच लागू आहेत.

411

Bandhan Bank : या खाजगी क्षेत्रातील बँकेने ज्येष्ठ नागरिकांना 600 दिवसांच्या एफडीवर 8.50% परतावा दिला आहे. हे दर 6 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत. क्रेडिट कार्ड वापरता ना? मग कधीच करु नका 'या' 3 चुका, होऊ शकते नुकसान

511

Citi Bank : प्रायव्हेट सेक्टरमधील आणखी एक बँक ग्राहकांना 8.27% दराने FD वर व्याज दर देतेय. या व्याजाचा लाभ घेण्यासाठी 35 महिन्यांपर्यंतची एफडी बँकेत करावी लागेल. हे दर 13 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाले आहेत.

611

DCB Bank: ही बँक 700 दिवस ते 36 महिन्यांसाठी 8.35% दराने व्याज देतेय. एफडीवरील हे दर या बँकेच्या ग्राहकांसाठी 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत लागू आहेत.

711

Equitas Small Finance Bank: ही बँक ज्येष्ठ नागरिकांना 8.50% व्याजदर देत आहे. मात्र, यासाठी 888 दिवसांची एफडी करावी लागणार आहे. नवीन दर 14 डिसेंबर 2023 पासून लागू होणार आहेत. म्यूचुअल फंडवर कर्ज घ्यायचंय? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स

811

IndusInd Bank : 2 वर्षे ते 3 वर्षे 3 महिन्यांच्या कालावधीसाठी, ही बँक ज्येष्ठ नागरिकांना FD वर सर्वाधिक 8.25% व्याज देतेय. बँकेने हे व्याजदर 19 जानेवारी 2023 पासून लागू केले आहेत.

911

RBL Bank: प्रायव्हेट सेक्टरमधील ही बँक 453 दिवसांपासून ते 725 दिवसांच्या FD वर 8.30% दराने व्याज देतेय. या बँकेचे व्याजदर 1 फेब्रुवारी 2023 पासून लागू आहेत.

1011

Suryoday Small Finance Bank : ही स्मॉल फायनान्स बँक ज्येष्ठ नागरिकांना 999 दिवसांच्या एफडीवर जास्तीत जास्त 8.76% परतावा देतेय. हे दर 21 डिसेंबर 2022 पासून लागू आहेत. SBI, HDFC, ICICI बँकेत अकाउंट आहे? ही माहिती असायलाच हवी

1111

Ujjivan Small Finance Bank : ही बँक 560 दिवसांच्या एफडीवर 8.75% दराने व्याज देतेय. हे दर 5 नोव्हेंबर 2022 पासून लागू आहेत.

  • FIRST PUBLISHED :