आपली कार रस्त्यावर भरधाव वेगाने पळवायला अनेकांना आवडतं. मात्र पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे आपली गाडी जास्त स्पीडनं चालवणं महागात पडू शकतं. काही लोक जास्त फ्यूल खर्च होण्याच्या चिंतेत कार स्पीडमध्ये चालवत नाही. तर काही कार या जुन्या झाल्यामुळे कमी मायलेज देतात. आज आपण अशा काही टिप्स जाणून घेऊया. ज्यामुळे तुमची कार जबरदस्त मायलेज देऊ शकेल.
कार चालवताना टाइम क्लचवर पाय ठेवू नका. यामुळे इंधनाचा खर्च वाढेल आणि मायलेज कमी होईल.
चांगल्या मायलेजसाठी वेळेवर कारची सर्व्हिसिंग करत राहा. यामुळे इंधन कमी लागेल.
अनेक लोक गरजेशिवाय कारचा एसी ऑन ठेवतात. यामुळे 20% जास्त फ्यूल खर्च होतो.
टायरमध्ये कमी हवा असल्यामुळे कारवर प्रेशर पडतो. इंजिनमध्येही अडचणी येऊ लागतात.
रेड लाइट किंवा ट्रॅफिक जाम राहिल्यास कारचे इंजिन बंद करा. हे इंधन वाचवण्यात फायदेशीर आहे.