होमलोन घेण्यापूर्वी सर्व बँकांच्या व्याजदरांची तुलना करणं आवश्यक असतं. आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 5 बँकांचे व्याजदर आणि प्रोसेसिंग फीची माहिती देत आहोत. बँक बाजारच्या लिस्टनुसार ही यादी करण्यात आली आहे. यामध्ये कोणती बँक किती टक्के व्याजदराने होम लोन देतेय याचे डिटेल्स सांगितले आहेत.
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक SBI ग्राहकांना केवळ 8.85 टक्के दराने होम लोन देतेय. त्यासाठी 0.35 टक्के प्रोसेसिंग फिस द्यावी लागेल.
प्रायव्हेट सेक्टरची सर्वात मोठी कर्ज देणारी HDFC बँक 8.60 टक्के सुरुवाती दराने होम लोन देत आहे. यामध्ये फक्त 0.5 टक्के किंवा 3,000 रुपये यापैकी जे जास्त असेल तेवढी प्रोसेसिंग फिस द्यावी लागेल.
बँक ऑफ बडोदा केवळ 8.50% दराने होम लोन ऑफर करतेय.
पंजाब नॅशनल बँक 8.55 टक्के सुरुवाती दराने होम लोन देत आहे. त्यासाठी कर्जाच्या 0.35% (जास्तीत जास्त रु 15,000) प्रोसेसिंग फिस द्यावी लागेल.
Axis Bank 8.60% दराने होम लोन ऑफर करत आहे. लोन घेण्यासाठी, तुम्हाला 10,000 रुपये प्रोसेसिंग फिस द्यावी लागेल.