मुलींचे चांगले भविष्य आणि चांगले शिक्षण हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी शासन सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून पालकांना पाठबळ देतेय. या योजनेत अवघ्या 2 दिवसांत सुमारे 11 लाख खाती उघडण्यात आली. यावरून या योजनेच्या लोकप्रियतेचा अंदाज लावला जाऊ शकतो. भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे चालवण्यात येणाऱ्या एका कँपनेमध्ये हा विक्रम बनला आहे.
या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून पोस्ट ऑफिसचे अभिनंदन केलेय. 2015 मध्ये सुरू झालेल्या सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडण्यात आली आहेत. भरमसाठ व्याज आणि टॅक्स सूटचा लाभ मिळाल्याने ही योजना प्रत्येक वर्गाच्या पसंतीस उतरली आहे.
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत 2 दिवसांत 10.90 लाख अकाउंट उघडल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी भारतीय पोस्ट ऑफिसचे अभिनंदन केले. त्यांनी ट्विट केले, 'या महान कामगिरीबद्दल @IndiaPostOffice चे खूप खूप अभिनंदन! हा प्रयत्न देशातील मुलींचे भविष्य सुरक्षित करेल आणि त्यांना अधिक सक्षम बनवेल.'PPF मधून जास्त नफा कमावण्याची सोपी ट्रिक, होईल जास्त फायदा!
2015 मध्ये मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. एका रिपोर्टनुसार, या योजनेत दरवर्षी सुमारे 33 लाख खाती उघडली जातात आणि आतापर्यंत सुमारे 3 कोटी खाती उघडली गेली आहेत. मात्र सुकन्या समृद्धी योजनेची 11 लाख खाती अवघ्या 2 दिवसांत उघडणे हा नवा विक्रम आहे. टर्म प्लान खरेदी करण्याचा प्लान करताय? मग ही माहिती असायलाच हवी
योजनेची वैशिष्ट्ये आणि फायदे : सुकन्या समृद्धी योजनेत पैसे जमा करून मुलगी मोठी झाल्यावर मोठा निधी मिळवता येतो. या योजनेचा कालावधी 21 वर्षे असून यामध्ये 14 वर्षे पैसे जमा करावे लागतील आणि 21 व्या वर्षी संपूर्ण रक्कम व्याजासह मिळेल. या योजनेत, तुम्ही अल्प बचतीद्वारे दरवर्षी मोठी रक्कम कमवू शकता. Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या या 5 स्किम देतात जबरदस्त रिटर्न्स, लगेच करा गुंतवणूक!
तुम्ही 2 वर्षाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजना खाते उघडले आणि या योजनेत दरमहा सुमारे 4100 रुपये आणि एका वर्षात 50 हजार रुपये जमा केले. तर 14 वर्षांत एकूण 7 लाख रुपये जमा होतील. 21 व्या वर्षी खाते पूर्ण झाल्यावर, तुमच्या मुलीला एकूण 23,41,073 रुपये मिळतील. म्हणजे या योजनेत 16 लाखांपेक्षा जास्त व्याज मिळणार आहे. हे कॅल्क्युलेशन सध्याच्या 7.6 टक्के व्याजदरावर आधारित आहे.
सुकन्या समृद्धी योजनेत दरमहा पैसे जमा करण्याची सक्ती नाही. तुम्ही आर्थिक वर्षात एकरकमी रक्कमही जमा करू शकता. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस किंवा कोणतेही बँक खाते उघडता येते.