सोलर एसी सौर पॅनेलद्वारे सूर्यप्रकाशापासून निर्माण होणाऱ्या ऊर्जेवर काम करतात. यामुळे तुम्हाला वीज बिलातून दिलासा मिळेल. तसं पाहिलं तर रेग्यूलर एसी चालवण्यासाठी खूप जास्त वीज खर्च होते. एवढंच नाही तर त्याचा मेंटेनेंस खर्च देखील खूप जास्त आहे.
सोलर एसीमध्ये नेहमीच्या एसीच्या तुलनेत पावरचे जास्त ऑप्शन असतात. जिथे रेग्यूलर एसी फक्त विजेवर काम करतात. दुसरीकडे, तुम्ही सोलर एसी तीन प्रकारे वापरू शकता, तुम्ही ते सोलर पॉवर, सोलर बॅटरी बँक आणि इलेक्ट्रिसिटी ग्रिडने देखील चालवू शकता.
सोलर AC साठी घराच्या छतावर सोलर पॅनल बसवले जातात. सोलर पॅनेल फक्त दिवसा काम करतात, परंतु तुम्हाला बॅटरी स्टोरेज युनिट्स देखील मिळतात, ज्याच्या मदतीने तुम्ही रात्रीच्या वेळी बॅटरीद्वारे एक्सट्रा वीज वापरू शकता.
सोलार एसीची किंमत नेहमीच्या एसीपेक्षा जास्त असली तरी ते बसवल्यानंतर तुमचे वीज बिल शून्य होते. त्याची किंमत तुम्ही तुमच्या जवळच्या बाजारातून जाणून घेऊ शकता. याशिवाय सोलर एसी काही वेबसाइटवर लिस्ट करण्यात आला आहे, जिथून तुम्ही ते खरेदी करू शकता.
सोलर एसी बसवण्याचे अनेक फायदे आहेत. यात एसी पॉवर वापरत नाही, त्यामुळे तुमची वीज बिलातून सुटका होते. तर, तुम्हाला नेहमीच्या एसीमध्ये मिळणारी सर्व वैशिष्ट्ये जसे की ऑटो स्टार्ट मोड, टर्बो कूल मोड, ड्राय मोड, स्लीप मोड, ऑन-ऑफ टायमर, ऑटो क्लीन, स्पीड सेटिंग, लव्हर स्टेप अॅडजस्ट आणि रिमोटवरील ग्लो बटण सर्वच मिळतं.