अनेक लोक पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पैसे बुडण्याचा धोका नसल्यामुळे आणि चांगले व्याज मिळत असल्याने ही योजना खूप लोकप्रिय आहे. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम, ज्यांना पोस्ट ऑफिस एफडी देखील म्हणतात, बँक एफडीपेक्षा यामध्ये जास्त व्याजदर आहेत.
कोणताही प्रौढ भारतीय नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये टाइम डिपॉझिट खाते उघडू शकतो. पालक देखील पोस्ट ऑफिसमध्ये मुलाच्या नावाने टाइम डिपॉझिट अकाउंट उघडू शकतात.
पोस्ट ऑफिस एफडी अकाउंट किमान 1000 रुपये जमा करून उघडता येते. कमाल ठेवीवर मर्यादा नाही. हजार, लाख किंवा कोटी, तुम्हाला हवे तितके पैसे जमा करू शकता.
पोस्ट ऑफिसच्या एक वर्षीय टाइम डिपॉझिटवर सरकारने व्याजदर 6.8 टक्क्यांवरून 6.9 टक्के केला आहे. आता तुम्ही या योजनेत एका वर्षासाठी 10,000 रुपये गुंतवल्यास, तुम्हाला मॅच्युरिटीवर 10,708 रुपये मिळतील.
सरकारने 1 जुलै 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या दोन वर्षांच्या टाइम डिपॉझिटच्या व्याजदरातही वाढ केली आहे. आता या योजनेत पैसे गुंतवणाऱ्यांना 6.9 टक्क्यांऐवजी 7.0 टक्के व्याज मिळेल. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 10,000 रुपये गुंतवले तर त्याला मॅच्युरिटीवर 11,489 रुपये मिळतील.
पाच वर्षांच्या रेकरिंक डिपॉझिटचे व्याजही 6.5 टक्के करण्यात आले आहे. मागील तिमाहीत ते 6.2 टक्के होतं.
3 वर्षांच्या टाइम डिपॉझिट अकाउंटच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. मागील तिमाही प्रमाणेच, 7.0 टक्के व्याज फक्त या तिमाहीत उपलब्ध असेल. तुम्ही या एफडीमध्ये 10,000 रुपये गुंतवल्यास, एफडी मॅच्योर झाल्यावर तुम्हाला 12,314 रुपये मिळतील.
त्याचप्रमाणे, पोस्ट ऑफिसच्या पाच वर्षांच्या टाइम डिपॉझिटवर गुंतवणूक करणाऱ्यांना या तिमाहीत केवळ 7.5 टक्के व्याज मिळेल. यावेळी या योजनेच्या व्याजातही वाढ करण्यात आलेली नाही. तुम्ही पाच वर्षांसाठी यामध्ये 10,000 रुपये गुंतवल्यास, योजना पूर्ण झाल्यावर तुम्हाला 14,499 रुपये मिळतील.