NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Bank Account: सेव्हिंग अकाउंट सुरु करावं की करंट अकाउंट? कुठे मिळतो जास्त फायदा?

Bank Account: सेव्हिंग अकाउंट सुरु करावं की करंट अकाउंट? कुठे मिळतो जास्त फायदा?

Savings Account Vs Current Account: आजच्या काळात सहसा प्रत्येक व्यक्तीचे बँक अकाउंट असते. सहसा लोक बँकेत सेव्हिंग अकाउंट उघडतात. मात्र, बँकांमध्ये अनेक प्रकारची अकाउंट उघडली जातात. यामध्ये सर्वात बेसिक सेव्हिंग आणि करंट अकाउंट असतात. यामध्ये फरक काय आणि फायदा कशात हे जाणून घेऊया.

16

बँकेत सेव्हिंग अकाउंट सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी ऑफर केलं जातं. तर करंट अकाउंट त्यादिवशी होणाऱ्या व्यावसायिक व्यवहारासाठी व्यावसायिकांसाठी करंट अकाउंट तयार करण्यात आलंय. सेव्हिंग अकाउंटमध्ये व्याज मिळतं मात्र करंट अकाउंटमध्ये कोणतंही व्याज दिलं जात नाही.

26

खातेधारक सेव्हिंग अकाउंटमध्ये ठराविक मर्यादेपर्यंतच ट्रांझेक्शन करू शकतात. त्याच वेळी, करंट अकाउंटमध्ये व्यवहारांसाठी कोणतीही निश्चित मर्यादा नाही, तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे काढू किंवा जमा करू शकता.

36

सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान बॅलेन्स असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक बँकांनी ते रद्द केले. त्याचबरोबर आता झिरो बॅलेन्सवरही सेव्हिंग अकाउंट उघडले जाते. करंट अकाउंटमध्ये किमान जमा राशीची सीना सेव्हिंग अकाउंटपेक्षा जास्त असते.

46

बँक बचत योजना आणि सेव्हिंग अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स लागतो. सेव्हिंग अकाउंटवर मिळालेले व्याज एका आर्थिक वर्षात ₹10,000 पर्यंत असल्यास, त्यावर कर आकारला जाणार नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही मर्यादा 50,000 पर्यंत आहे. ही वजावट आयकर कायद्याच्या कलम 80TTA अंतर्गत उपलब्ध आहे.

56

तुमच्या सेव्हिंग अकाउंटमधून मिळणारे व्याज तुमच्या इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात जोडले जाते आणि त्यानंतर तुमच्या एकूण उत्पन्नावर संबंधित टॅक्स ब्रॅकेटनुसार टॅक्स आकारला जातो. दुसरीकडे, करंट अकाउंटवर व्याज मिळत नसेल तर टॅक्स लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

66

करंट अकाउंटमध्ये व्याज उपलब्ध नसले तरी ओव्हरड्राफ्ट सुविधा म्हणजे जास्तीचे पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, तुमचा व्यवहार पाहून ही सुविधा बँक ठरवते. आजकाल अनेक बँका सॅलरी सेव्हिंग अकाउंटवरही ओव्हर ड्राफ्टची सुविधा देते.

  • FIRST PUBLISHED :