Samrudhhi Mahamarg Tyre Rule : समृद्धी महामार्गावरील अपघातांचे प्रमाण वाढलेय. यामधील अपघातांचे प्रमुख कारण हे गाड्यांचे टायर खराब असणं हे आहेत. टायर फुटल्यामुळे दुर्घटना होऊ शकतात. याच कारणामुळे आता प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
टायर घासलेल्या अवस्थेत समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारची कारवाई करत गुरुवारी आरटीओने 3 वाहनांवर प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या प्राणांतिक अपघातात 36 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे या अपघातांवर आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अपघातांमधील बहुतांश अपघात हे घासलेल्या टायरमुळे झाल्याचे पाहायला मिळाले. यासाठी आरटीओने घासलेल्या टायर वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत 'Tred depth Analyzer' च्या साह्याने टायरची तपासणी केली. यात तीन वाहनांचे टायर जास्त घासलेले तपासात समोर आले.
या टायरसह लांब पल्ल्याचे सलग वाहन चालवणे धोकादायक ठरते. ज्यामुळे या वाहनांवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करीत प्रत्येकी 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला शिवाय या वाहनांना समृद्धी महामार्गावरून जाण्यास प्रतिबंध घालण्यात आला.