NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / RuPay क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी धमाकेदार ऑफर, मिळतंय 100% कॅशबॅक आणि बरंच काही

RuPay क्रेडिट कार्ड होल्डर्ससाठी धमाकेदार ऑफर, मिळतंय 100% कॅशबॅक आणि बरंच काही

तुम्ही 7 मे रोजी Starbucks India आउटलेटवर UPI QR कोड स्कॅन करून RuPay क्रेडिट कार्डने पैसे भरल्यास, तुम्हाला 100% कॅशबॅक मिळेल.

15

मुंबई, 7 मे: रुपे क्रेडिट कार्ड धारकांसाठी एक उत्तम संधी आहे. आज (7 मे) तुम्ही 100% कॅशबॅक मिळवू शकता. तुम्हाला रुपे क्रेडिट कार्ड UPI अॅपशी लिंक करून पेमेंट करावे लागेल. यानंतर तुम्हाला ही बंपर कॅशबॅक ऑफर मिळेल. एवढंच नाही तर कॅशबॅकसोबतच मोफत कॉफी पिण्याचीही संधी आहे.

25

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या सोशल मीडिया पोस्टद्वारे या उत्तम ऑफरची माहिती दिली आहे. ऑफरनुसार, तुम्ही 7 मे 2023 रोजी टाटा ग्रुपच्या स्टारबक्स इंडिया आउटलेटवर UPI QR कोड स्कॅन करून रुपे क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 100% कॅशबॅक मिळेल.

35

यासोबतच तुम्हाला मोफत कॉफी पिण्याची संधीही मिळू शकते. कॅशबॅकची कमाल मर्यादा रु.1000 आहे. कॅशबॅकची रक्कम तुमच्या RuPay क्रेडिट कार्ड खात्यात जमा केली जाईल.

45

महत्त्वाचं म्हणजे, 2022 मध्ये UPI सुविधेवर रुपे क्रेडिट कार्ड सुरू करण्यात आले. आता तुम्ही शेजारच्या दुकानात UPI QR कोड स्कॅन करून क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकाल. पूर्वी फक्त बँक अकाउंट यूपीआय अॅपशी लिंक करुनच पेमेंटची सुविधा होती.

55

RuPay क्रेडिट कार्डद्वारे, तुम्ही मर्चेंट UPI QR कोड स्कॅन करूनच पैसे देऊ शकता. P2P पेमेंट करू शकत नाही. सध्या, BHIM, Paytm, PhonePe, PayZapp, Freecharge सारख्या निवडक UPI अॅप्सवर 8 बँकांकडील Rupay क्रेडिट थेट चालू आहे.

  • FIRST PUBLISHED :