NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / 31 मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम; RBI चा आदेश काय?

31 मार्चपर्यंत बँकांना राहणार नाही एकही सुट्टी, रविवारीही होईल काम; RBI चा आदेश काय?

आरबीआयने सर्व बँकांना रविवारी सुरु राहण्याचे निर्देश दिलेय. येत्या 31 मार्च रोजी सध्याच्या आर्थिक वर्षाचा अखेरचा दिवस आहे. या काळात बँकांमध्ये क्लोजिंगचे काम असते. याच कारणामुळे आरबीआयने सर्व बँकांना सरकारी देवाण घेवाणीसाठी शाखा सुरु ठेवण्याचे आदेश दिलेय.

15

2022-2023 चं आर्थिक वर्ष सुरु होण्यास अगदी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. 1 एप्रिलसह नवीन फायनेंशियल ईयर सुरु होणार आहे. या दरम्यान वर्षभरातील सर्व खर्चांचा हिशोब केला जातो.

25

मार्च महिन्यातच सर्व अकाउंटचा हिशोब केला जातो. नंतर ते क्लोज केले जाते. अशा परिस्थितीत रविवारी सर्व बँका खुल्या ठेवण्याच्या सूचना आरबीआयकडून देण्यात आल्या आहेत. 31 मार्च हा चालू आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी बँकांमध्ये क्लोजिंगचे काम केले जाते. यामुळेच आरबीआयने सर्व बँकांना सरकारी व्यवहारांसाठी शाखा सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

35

मात्र ग्राहकांसाठी या काळात बँकांमध्ये कामकाज होणार नाही. मात्र बँक ब्रांचमध्ये चेक जमा होऊ शकतील. यासोबतच सध्या ऑनलाइन बँकिगही सुरु राहील. 31 मार्चनंतर सलग 2 दिवस म्हणजेच 1 आणि 2 एप्रिलला बँकांमध्ये कामकाज होणार नाही.

45

आरबीआयचे निर्देश काय? : केंद्रीय बँकांच्या पत्रात म्हटले की, 'सर्व एजेन्सी बँकांना 31 मार्च, 2023 ला सामान्य कामकाजाच्या वेळेत सरकारी व्यवहारांशी संबंधित काउंटर व्यवहारांसाठी आपल्या नियुक्त शाखा खुल्या ठेवायला हव्यात.' पुढे त्यांनी सांगितले की, नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर आणि रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट सिस्टीमद्वारे 31 मार्च 2023 च्या मध्यरात्री 12 पर्यंत व्यवहार सुरू राहतील. तसेच, 31 मार्च रोजी सरकारी धनादेश जमा करण्यासाठी विशेष क्लिअरिंग घेण्यात येईल, ज्यासाठी पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टम विभाग, आरबीआय आवश्यक सूचना जारी करेल.

55

31 मार्चपूर्वी आधार पॅनशी लिंक करा. तुम्ही असे न केल्यास 1 एप्रिलपासून तुमच्या पॅनचा काहीही उपयोग होणार नाही. पंतप्रधान वय वंदना योजनेचा अखेरचा दिवसही हाच आहे.

  • FIRST PUBLISHED :