NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Railway Knowledge: या क्रॉसिंगवर ऑटोमॅटिक पुढे चालते ट्रेन, कट केलं जातं विजेचं कनेक्शन; पण का?

Railway Knowledge: या क्रॉसिंगवर ऑटोमॅटिक पुढे चालते ट्रेन, कट केलं जातं विजेचं कनेक्शन; पण का?

नवी दिल्ली, 6 जुलै : देशात एक रेल्वे क्रॉसिंग अशी आहे जिथे तुम्हाला प्रत्येक दिशेने गाड्या येताना दिसतील. या सर्व लाइन एकाच ठिकाणी एकत्र येतात आणि नंतर डायमंड क्रॉसिंग तयार होते. महाराष्ट्रातील नागपूर येथे देशातील एकमेव डायमंड क्रॉसिंग आहे. ते पाहण्यासाठी लांबून लोक येतात.

16

येथील ट्रॅक्स एकाच ठिकाणी आहेत. यामुळे डामंडसारखा शेप तयार होतो. यासोबतच येथे आणखी एक अनोखी गोष्ट आहे जी इतर कोणत्याही क्रॉसिंगवर क्वचितच घडते. इथे येताच ट्रेनचा पेंटोग्राफ खाली टाकला जातो आणि ट्रेन कोणत्याही पावरशिवाय पुढे सरकते.

26

अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, असे का केले जाते आणि पावरशिवाय गाडी कशी पुढे जात राहते. याची 2 वेगवेगळी कारणे आहेत. कदाचित तुमच्यापैकी अनेकांना याची माहिती असेल, पण ज्यांना माहित नसेल त्यांनाही आज कळेल.

36

सर्वात आधी आपण पेंटोग्राफ म्हणजे काय ते जाणून घेऊ. पँटोग्राफ इंजिनच्या वर बसवलेला असतो. इंजिनच्या वरती कारच्या वायपरच्या आकाराचं एक उपकरण बसवलेलं असतं. जे ओव्हरहेड वायरला चिकटून चालते हे तुम्ही पाहिले असेल. हा पँटोग्राफ आहे. पँटोग्राफचे काम म्हणजे वायरमधून इंजिनच्या ट्रान्सफॉर्मरपर्यंत वीज पोहोचवणे.

46

यावरुनच चालते ट्रेन. हे क्वचितच घडते की वायरशी त्याचे कनेक्शन तुटते. कारण त्याची रचना अतिशय फ्लेक्सिबल केली गेली आहे आणि उतार आला किंवा ट्रॅक चढावर चढू लागला तरी तो नेहमी स्वतःला जुळवून घेतो आणि वायरला चिकटून राहतो. ते वेगळे होताच, इंजिनला पावर सप्लाय बंद होईल आणि ट्रेन तिथेच थांबेल.

56

पण डायमंड क्रॉसिंगवर ते मुद्दाम कमी केले जाते. कारण, त्या क्रॉसिंगवर अनेक ओव्हरहेड वायर्स आहेत ज्यामध्ये पेंटोग्राफ अडकण्याचा धोका असतो. असे झाल्यास रेल्वे आणि प्रवासी दोघांसाठीही धोक्याची घंटा आहे. म्हणूनच पेंटोग्राफ खाली केला आहे.

66

पेंट्रोग्राफ खाली झाल्यानंतरही, फिजिक्सच्या नियम लॉ ऑफ इनर्शियामुळे ट्रेन चालत राहते. हा न्यूटनचा गतीचा पहिला नियम आहे. त्यानुसार, कोणतीही गोष्ट जोपर्यंत कोणीतरी धक्का देत नाही किंवा थांबवत नाही तोपर्यंत ती चालत राहते किंवा थांबलेली. ट्रेनची स्पीड आधीच जास्त असते. त्यामुळे आधीच मिळालेल्या फोर्समुळे ट्रेन काही काळ पुढे जाते. आणि डायमंड क्रॉसिंग ओलांडताच पेंटोग्राफ पुन्हा जोडला जातो. हे फक्त थोड्या अंतरापर्यंतच केले जाऊ शकते कारण त्यानंतर चाके आणि ट्रॅकमधील घर्षणामुळे ट्रेन थांबते.

  • FIRST PUBLISHED :