NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Railway Facts: विजेवर चालणाऱ्या लोखंडाच्या ट्रेनमध्ये का उतरत नाही करंट? इंट्रेस्टिंग आहे कारण

Railway Facts: विजेवर चालणाऱ्या लोखंडाच्या ट्रेनमध्ये का उतरत नाही करंट? इंट्रेस्टिंग आहे कारण

Railway Knowledge : संपूर्ण ट्रेन ही स्टीलने तयार झालेली असते. इंजिन, कोचपासून तर चाकांपर्यंत सर्वच लोखंडाचं असतं. ही स्टीलने तयार झालेली ट्रेन इलेक्ट्रिसिटीने चालते आणि तरीही यात करंट उतरत नाही. सामान्यतः लोखंड आणि पाण्यात करंट उतरत मग तरीही ट्रेनमध्ये कसं उतरत नाही. याविषयीच आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

16

काही वर्षांपूर्वी रेल्वेगाड्या डिझेल इंजिनने धावायच्या. पण आज रेल्वेचे पूर्णपणे विद्युतीकरण झालेय. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त लहान-मोठ्या गाड्या विजेवर धावतात.

26

गाड्या चालवण्यासाठी, इंजिनच्या वर बसवलेल्या डिव्हाइसमधून करंट मिळतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा करंट इंजिन आणि ट्रेनमध्ये पसरत नाही. हे कसं होतं हे खूप कमी लोकांना माहिती आहे.

36

विजेवर चालत असूनही, तुम्हाला ट्रेनमध्ये करंट जाणवत नाही. कारण कोचचा हाय व्होल्टेज लाइनशी थेट संपर्क होत नाही. या टच हाय व्होल्टेज लाईनने ट्रेन रुळावर धावते.

46

हाय व्होल्टेज लाइनमधून करंटचा सप्लाय ट्रेनला इंजिनच्या वर लावलेल्या पेंटोग्राफद्वारे मिळतो. ट्रेनच्या इंजिनच्या वर बसवलेला हा पँटोग्राफ नेहमी हाय व्होल्टेज लाइनला जोडलेला असतो हे तुम्ही पाहिले असेल.

56

त्याचबरोबर हाय व्होल्टेज लाइनच्या संपर्कात न आल्याने डबे विद्युत प्रवाहापासून वाचतात. मात्र इंजिनमध्ये विद्युतप्रवाह उतरतो, मग त्यात विजेचा शॉक का नाही, असा प्रश्नही उपस्थित होतो.

66

खरं तर, इंजिनमध्ये पेंट्रोग्राफच्या खाली Insulators लावले जातात. जेणेकरून करंट इंजिनच्या बॉडीमध्ये उतरु नये. याशिवाय, ट्रॅक्शन ट्रान्सफॉर्मर, मोटार इत्यादी इलेक्ट्रिक डिव्हायसेजमधून निघाल्यानंतर रिटर्न करंट पुन्हा चाक आणि एक्सलमधून रेल्वेमध्ये आणि अर्थ पोटेंशियल कंडक्टरमधून परत जातं.

  • FIRST PUBLISHED :