भारतीय रेल्वेचे देशात अनेक कारखाने आहेत जे कोच आणि इंजिन तयार करतात. यामध्ये चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स, चित्तरंजन, डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स, वाराणसी, इंटिग्रल कोच फॅक्टरी, चेन्नई, रेल कोच फॅक्टरी, कपूरथला, रेल व्हील फॅक्टरी, बंगलोर, डिझेल लोको मॉडर्नायझेशन वर्क्स, पटियाला आणि मॉडर्न कोच फॅक्टरी, रायबरेली यांचा समावेश आहे.
या रेल्वे कोच फॅक्ट्रीमध्ये दरवर्षी मागणीनुसार ट्रेनचे डबे तयार केले जातात. बदलत्या काळानुसार अत्याधुनिक सुविधांसह नवीन डब्यांची मागणी वाढत असल्याने या कारखान्यांमध्ये दरवर्षी हजारो कोच तयार केले जातात.
1986 मध्ये स्थापन झालेल्या कपूरथला RCF फॅक्ट्रीने प्रवासी वाहनांसह विविध प्रकारचे 30,000 प्रवासी डबे तयार केले आहेत. या फॅक्ट्रीमध्ये वर्षाला 1025 डबे तयार करण्याची क्षमता आहे. भारतीय रेल्वेच्या एकूण डब्यांपैकी 35% पेक्षा जास्त डबे येथे तयार केले जातात.
चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF) ने जगातील सर्वात मोठ्या कोच निर्माता कंपनीचा मान मिळवलाय. चीनमधील जगातील सर्वात मोठी कोच उत्पादक कंपनी वर्षाला सुमारे 2600 कोच बनवते, तर चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी त्याच्या पेक्षाही पुढे आहे.
ट्रेनच्या डब्यांची निर्मिती ही खूप गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. त्याच्या बांधकामाचे अनेक टप्पे आहेत. कोचचा बाहेरचा भाग स्टेनलेस स्टीलचा बनलेला असतो. तर आतील भाग बनवण्यासाठी अॅल्युमिनियमचा वापर केला जातो. कोच तयार झाल्यानंतर त्यात व्हील्स बसवली जातात.
ट्रेनचा कोच बनवण्यासाठी खूप खर्च येतो. त्यात स्टीलचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, एसी कोच बनवण्यासाठी 2.8 ते 3 कोटी रुपये, स्लीपर कोच 1.25 कोटी आणि जनरल कोचसाठी 1 कोटी रुपये खर्च येतो.
सामान्य पॅसेंजर ट्रेनला सरासरी 24 डबे असतात. त्यानुसार ट्रेनच्या एकूण खर्चाचा अंदाज घेतला तर ती तयार करण्यासाठी सुमारे 66 कोटी रुपये खर्च येतो. यामध्ये इंजिन निर्मितीच्या खर्चाचाही समावेश होतो.
ट्रेनचे इंजिन बनवण्यासाठी सर्वाधिक खर्च येतो. NDTV च्या रिपोर्टनुसार, ड्युअल मोड लोकोमोटिव्ह इंजिनच्या निर्मितीसाठी 18 कोटी रुपये खर्च येतो. तर 4500 हॉर्सपावरच्या डिझेल लोकोमोटिव्ह इंजिनची किंमत 13 कोटी रुपये आहे.