NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Railway Knowledge: कुठे असतं रेल्वेचं पेट्रोल पंप? कसं भरलं जातं डिझेल? घ्या जाणून

Railway Knowledge: कुठे असतं रेल्वेचं पेट्रोल पंप? कसं भरलं जातं डिझेल? घ्या जाणून

Railway Knowledge: भारतामध्ये अद्याप सर्व रेल्वे लाइनवर विद्युतीकरणाचं कामं पूर्ण झालेलं नाही. यामुळे अनेक मार्गांवर अजुनही डिझलचं इंजिनच चालतं. पण यात इंधन कुठून भरलं जातं तुम्हाला माहितीये? याविषयी सविस्तर आपण जाणून घेणार आहोत.

16

देशातील ट्रेनचे विद्युतीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरु आहे. म्हणजेच इंजिन डिझेल व्यतिरिक्त इलेक्ट्रीसिटीवर चालू शकेल असं बनवलं जातंय. मात्र अद्यापही अनेक ट्रेन पूर्ण किंवा आशिंक स्वरुपात या डिझेलवर चालवल्या जातात. या ट्रेनमध्ये डिझेल कुठं भरलं जातं माहितीये?

26

या ट्रेनचं पेट्रोल पंप कुठे असतो. या ट्रेनला ईंधन देण्यासाठी कोणत्याही विशेष पेट्रोल पंप किंवा यार्डमध्ये नेण्याची गरज नसते. तर हे काम स्टेशनवच केलं जातं. स्टेशनवरच इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी पाइप लाइन लावलेली असते. हा पाइप रेल्वे रुळाच्या अगदी बाजूलाच असतो. जेणेकरुन गाडी तिथे उभी करुन आरामात डिझेल भरता येईल. पंप लपवण्यासाठी एक स्टील बॉक्स तयार केलेला असतो. डिझेल भरण्याची जबाबदारी दिलेल्या कर्मचाऱ्याकडे याची चावी असते.

36

बॉक्स ओपन केल्यानंतही पंप चालू करण्यासाठी लागणारं विशेष औजार केवळ त्याच कर्मचाऱ्याजवळ असतं. ज्या प्रमाणा सामान्य वाहनांमध्ये पाइट लावून डिझेल भरलं जातं अगदी त्याच प्रमाणे ट्रेनमध्येही डिझेल भरलं जातं. डिझेलच्या टँक जवळ एक मापक असतं ज्यावरुन किती डिझेल भरलंय हे कळतं.

46

कुठं भरलं जातं डिझेल: कोणत्याही ट्रेनच्या पहिल्या स्टेशनवर त्याची टँक भरली जाते. कमी अंतराच्या प्रवासासाठी पहिल्याच वेळी भरलेलं डिझेल पुरेसं असतं. मात्र ट्रेनचा प्रवास दूरचा असेल तर इंजिन एखाद्या स्टेशनवर थांबवून डिझेल भरावं लागलं. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शनवर पुन्हा डिझेल भरलं जातं. ट्रेनच्या इंजिनमध्ये डिझेलची क्षमता 5-6 हजार लीटर असते. जर डिझेल 1500 लीटरच्या खाली आलं तर त्याला जवळच्या स्टेशनवर रीफिल केलं जातं.

56

दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये पंडित दीन दयाल उपाध्याय जंक्शनवर पुन्हा डिझेल भरलं जातं. ट्रेनच्या इंजिनमध्ये डिझेलची क्षमता 5-6 हजार लीटर असते. जर डिझेल 1500 लीटरच्या खाली आलं तर त्याला जवळच्या स्टेशनवर रीफिल केलं जातं.

66

रेल्वेचं इंजिन किती मायलेज देतं? : रेल्वेचं मायलेज वेगवगेळ्या ट्रेनवर अवलंबून असतं. 12 किंवा 24 कोचची पॅसेंजर ट्रेनचं इंजिन 6 लीटरमध्ये केवळ 1 किलोमीटरच चालते. तर 12 डब्ब्यांची एक्सप्रेस ट्रेनचं इंजिन 4.5 लीटरमध्येच 1 किलोमीटरपर्यंत चालतं. कारण एक्सप्रेस ट्रेनमध्ये वारंवार ब्रेक घेतला जात नाही आणि कमी डिझेल खर्च होतं.

  • FIRST PUBLISHED :