NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Indian railway: या आहेत देशातील सर्वात लांब प्रवासाच्या ट्रेन, 5-10 तास नाही तर लागतात 3-4 दिवस!

Indian railway: या आहेत देशातील सर्वात लांब प्रवासाच्या ट्रेन, 5-10 तास नाही तर लागतात 3-4 दिवस!

Indian railway:विवेक एक्सप्रेस आणि हिमसागर एक्सप्रेस ही नावे भारतातील लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या लिस्टमध्ये आहेत. या दोन्ही ट्रेन सुमारे 3500 ते 4000 किलोमीटर अंतराचा प्रवास करतात. याशिवाय काही इतर गाड्या आहेत ज्यांचा लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात समावेश आहे. त्यांची नावे आणि मार्गांचे डिटेल्स जाणून घेऊया.

16

भारतीय रेल्वेला देशाची लाइफ-लाइन म्हटलं जातं. कारण भारतात दररोज 13 हजाराहून अधिक ट्रेन धावतात. ज्यामध्ये कोट्यवधी लोक प्रवास करतात. यामध्ये मेल एक्सप्रेस, सुपरफास्ट आणि शताब्दीसह अनेक गाड्यांचा समावेश आहे. यातील अनेक गाड्या लांब पल्ल्याचा प्रवास करतात. पण तुम्हाला माहित आहे का देशातील 5 सर्वात लांब मार्गाची ट्रेन कोणती आहे? चला तर मग जाणून घेऊया.

26

भारतात दररोज 13 हजाराहून अधिक प्रवासी ट्रेन 7,325 स्टेशन क्रॉस करतात. भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय दोन्ही मार्गांवर दररोज 13,169 प्रवासी गाड्या चालवते. यामध्ये लॉन्ग रुट आणि शॉर्ट रुट दोन्ही प्रकारच्या ट्रेनचा समावेश आहे. यापैकी, सर्वात लांब अंतराचा प्रवास करणाऱ्या ट्रेनचा प्रवास 4000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.

36

दिब्रुगढ ते कन्याकुमारी दरम्यान धावणारी विवेक एक्सप्रेस (ट्रेन क्र. 22504) 4150 किलोमीटर अंतर कापते. ही ट्रेन हा प्रवास 74:35 तासांत पूर्ण करते. यादरम्यान ती 9 राज्यांमधून जाते आणि 59 स्टेशनवर स्टॉप घेते.

46

कोईम्बतूर-सिलचर एक्सप्रेस:- ही सुपरफास्ट ट्रेन कोईम्बतूर ते सिलचर (ट्रेन क्र. १२५१५) दरम्यान धावते आणि 3492 किलोमीटर अंतर कापते. या प्रवासादरम्यान ही ट्रेन 46 स्टेशनवर थांबते.

56

हिमसागर एक्सप्रेस (16318) ही माता वैष्णोदेवी ते कन्याकुमारी पर्यंत चालणारी वीकली ट्रेन आहे. ही ट्रेन 3787 किलोमीटर अंतर कापते. या दरम्यान ही ट्रेन 12 राज्यांमधून जाते आणि 70 स्टेशनवर थांबते.

66

तिरुनेलवेलीपासून माता वैष्णो देवी मेल एक्सप्रेस (16787) तिरुनेलवेली ते तामिळनाडूमधील कटरा असा प्रवास करते. ही ट्रेन अंदाजे 3,631 किलोमीटर अंतर कापते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनचा एकूण वेळ 71 तास 20 मिनिटे आहे. या दरम्यान ती 59 स्टेशनवर थांबते. याशिवाय अशा अनेक गाड्या आहेत, ज्या 1500 ते 2000 किलोमीटरचा प्रवास करतात आणि अनेक राज्यांच्या शहरांना रेल्वेने एकमेकांशी जोडतात.

  • FIRST PUBLISHED :