आर्थिक वर्ष 2022-23 संपण्यापूर्वी कोणती कामं करावी हे आज आपण जाणून घेणार आहोत. हे काम केले नाही तर तुम्हाला अनेक समस्यांना समोरं जावं लागू शकतं. कारण अवघ्या तीन दिवसांनंतर 2022-23 हे आर्थिक वर्ष संपणार आहे.
आधार-पॅन लिंक : तुम्ही अजुनही आधार पॅन लिंक केला नसेल, तर लगेच करुन घ्या. हे 31 मार्च 2023 पर्यंत केले नाही तर तुमचं पॅन निष्क्रिय होईल.
टॅक्स सेव्हिंग : 2022-23 या आर्थिक वर्षासाठी तुम्ही अजुनही गुंतवणूक केली नसेल तर तत्काळ करा. तुम्ही PPF, सुकन्या समृद्धी योजना, 5 वर्षांची FD आणि ELSS अशा स्किममध्ये गुंतवणूक करु शकता. यावर कलम 80C अंतर्गत कर सूट देखील मिळवता येईल. यासाठी तुम्हाला 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करावी लागेल.
पीएम वय वंदना योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी पीएम वय वंदना योजना 31 मार्च 2023 नंतर बंद होणार आहे. यामुळे यामध्ये कोणाला गुंतवणूक करायीच असेल तर अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत.
पीएम वय वंदना योजना : ज्येष्ठ नागरिकांसाठी असणारी पीएम वय वंदना योजना 31 मार्च 2023 नंतर बंद होणार आहे. यामुळे यामध्ये कोणाला गुंतवणूक करायीच असेल तर अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत.
म्यूच्युअल फंड नॉमिनी : म्यूच्युअल फंडामध्ये नॉमिनेशनची प्रक्रिया अजुनही पूर्ण केलेली नसेल तर तत्काळ करा. यासाठी 31 मार्चची मुदत सर्व फंड हाऊसेसकडून देण्यात आली आहे. अन्यथा तुमचं म्यूच्युअल फंड अकाउंट फ्रिज केलं जाईल.
SBI अमृत कलश योजना :SBI ची अमृत कलश योजना 31 मार्चला संपणार आहे. या अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना 7.6 टक्के तर इतरांना 7.1टक्के व्याज दिले जात आहे. या फिक्स्ड डिपॉझिट योजनेत 400 दिवसांसाठी गुंतवणूक करावी लागेल.