NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Home Loan : ना सॅलरी, ना इन्कम टॅक्स, तरीही मिळेल होम लोन! फक्त करा हे काम

Home Loan : ना सॅलरी, ना इन्कम टॅक्स, तरीही मिळेल होम लोन! फक्त करा हे काम

Home Loan without Salary Slip: देशात कोट्यवधी असे लोक आहेत ज्यांच्याजवळ नोकरी नाही. तसंच ते इन्कम टॅक्सही भरत नाही. अशा वेळी या लोकांना होम लोन घ्यायचं असेल तर त्यांनी काय करावं? जास्तीत जास्त लोकांना वाटतं की, अर्जदारांना बँक लोन देत नाही. पण हे चुकीचं आहे. त्यांनाही लोन मिळू शकतं. फक्त प्रोसेस वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊया या प्रोसेसविषयी...

16

घर खरेदी करण्यासाठी जवळपास सर्वच लोक बँकेतून लोन घेतात. नोकरदार आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या लोकांना लोन सहज मिळतं. पण ज्या लोकांकडे नोकरी नाही तसंच जे आयटीआरही भरत नाही. त्या लोकांना लोन घेताना अडचणींचा सामना करावा लागतो.

26

अनेक लोकांना असं वाटतं की, लोन फक्त नोकरी करणारे आणि इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करणाऱ्यांनाच मिळतं. पण असं नाही. जे लोक आयटीआर फाइल करत नाही त्यांनाही होम लोन मिळू शकतं. खरंतर बँक आयटीआरची माहिती अर्जदाराची इन्कम जाणून घेण्यासाठी मागतात.

36

देशात छोटे व्यवसाय किंवा इतर काम करणारे अनेक लोक आहेत, ज्यांचा पगार किंवा उत्पन्न टॅक्स स्लॅबमध्ये येत नाही. त्यामुळे ते आयकर रिटर्न भरत नाहीत. अशा लोकांना देखील होम लोन मिळतं. त्यासाठी एक प्रोसेस फॉलो करावी लागते.

46

बँक किंवा NBFC कडे कर्जासाठी अर्ज करताना, तुम्ही सॅलरी स्लिप व्यतिरिक्त पर्यायी उत्पन्न प्रमाणपत्रे दाखवू शकता. यामध्ये आयटीआर, उत्पन्न प्रमाणपत्र, तुमच्या व्यवसायाचे अकाउंट डिटेल्स इ. या कागदपत्रांद्वारे बँक तुमचे उत्पन्न आणि कर्जाची रक्कम परत करण्याची क्षमता तपासते.

56

बँक किंवा NBFC नेहमी प्रत्येक व्यक्तीची आर्थिक स्थिती पाहून कर्ज देते जेणेकरुन त्याला नंतर पैसे भरण्यात कोणतीही अडचण येऊ नये.

66

जे लोक इन्कम टॅक्स रिटर्न भरत नाहीत ते थेट बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकतात. आधार कार्ड आणि पॅन कार्ड व्यतिरिक्त, बँक ग्राहकांकडून बँक अकाउंटचे डिटेल्सही मागू शकते, ज्यामध्ये तुमचे उत्पन्न आणि ट्रांझेक्शनचे डिटेल्स असतात. या सर्व बाबी लक्षात घेऊन बँक उत्पन्नाच्या आधारेच कर्ज मंजूर करते.

  • FIRST PUBLISHED :