ऑनलाइन गेमिंगची आवड असलेल्या लोकांसाठी नवीन टॅक्स नियम आले आहेत. फायनान्स बिल 2023 च्या दुरुस्तीनुसार, ऑनलाइन गेमिंग अॅप्लिकेशन्सवर लागणारी कर वजावत आता 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. ऑनलाइन गेमिंगवर कमावलेल्या पैशांसंदर्भात हा नवा नियम आहे. चला तर मग जाणून घेऊया हा नवा नियम काय?
यापूर्वी जाहीर करण्यात आले होते की, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी ऑनलाइन गेमिंगवर TDS 1 जुलै 2023 पासून लागू होईल. मात्र, सरकारने लोकसभेत वित्त विधेयक मंजूर करून तारीख बदलली आहे. ज्या अंतर्गत आता 1 एप्रिलपासून TDS लागू केला जात आहे.
सध्याचा नियम काय आहे?: सध्याच्या नियमानुसार, ऑनलाइन गेममधून जिंकलेल्या रकमेवर टीडीएस लागू होतो. एखाद्या आर्थिक वर्षात एखाद्या व्यक्तीचे ऑनलाइन गेमिंगमधून 10,000 पेक्षा जास्त कमावले तर त्या जिंकलेल्या रकमेवर TDS लागू होतो.
काय असतील नवीन नियम? : नवीन नियमांनुसार, आता ऑनलाइन गेममधून जिंकलेल्या कोणत्याही रकमेवर टीडीएस कापला जाईल. तसंच यामध्ये एखादं प्रवेश शुल्क असल्यास, ते प्रथम काढून टाकले जाईल. त्यानंतर टीडीएसची रक्कम निश्चित केली जाईल.
ऑनलाइन गेममधून जिंकलेल्या रकमेवर 30 टक्के टीडीएस कापला जात आहे.