1 एप्रिल 2023 पासून सरकारने EPF मधून पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत. आता, पॅन लिंक नसल्यास, पैसे काढताना 30 टक्क्यांऐवजी 20 टक्के टीडीएस आकारला जाईल. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे.
बदललेल्या नियमाचा फायदा अशा पीएफ धारकांना होणार आहे, ज्यांचे पॅन अद्याप अपडेट केलेले नाहीत. जर खातेदाराने 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला टीडीएस भरावा लागतो. तर, 5 वर्षांनंतर कोणताही टीडीएस आकारला जात नाही.
याशिवाय, TDS साठी 10,000 रुपयांची किमान थ्रेशोल्ड लिमिट देखील बजेट 2023 मध्ये काढून टाकण्यात आली आहे. लॉटरी आणि पजल्स बाबतीत, 10,000 रुपयांच्या मर्यादेचा नियम लागू राहील. एका आर्थिक वर्षात एकूण 10 हजारांपर्यंतच्या अमाउंटवर टीडीएस कापला जाणार नाही. त्यानंतर टीडीएस कापला जाईल.
ज्या लोकांकडे टॅक्स पॅन कार्ड आहे त्यांना कमी टीडीएस भरावा लागतो. जर एखाद्याचे पॅनकार्ड ईपीएफओच्या रेकॉर्डमध्ये अपडेट केले नसेल तर त्याला 30% पर्यंत टीडीएस भरावा लागेल. आता ते 20 टक्के करण्यात आले आहे.
वरील परिस्थिती व्यतिरिक्त, जर एखाद्या व्यक्तीने EPFO खाते उघडल्यानंतर 5 वर्षांच्या आत पैसे काढले तर त्याला TDS भरावा लागेल. जर 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढली जात असेल आणि पॅन कार्ड उपलब्ध असेल तर 10% टीडीएस आकारला जाईल. परंतु जर पॅन नसेल तर त्याला आता 30% ऐवजी 20% टीडीएस भरावा लागेल.
पीएफ खात्यात जमा केलेली रक्कम अंशतः किंवा पूर्णपणे काढता येते. कर्मचारी निवृत्त झाल्यावर किंवा सलग 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ बेरोजगार राहिल्यास EPF रक्कम काढता येते. त्याच वेळी, मेडिकल इमरजेंसी, विवाह, गृहकर्ज भरणे यासारख्या परिस्थितीत या निधीमध्ये जमा केलेल्या रकमेचा काही भाग काही अटींवर काढता येतो.