NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनी / Mutual Fund म्हणजे काय? कशी करावी गुंतवणूक? सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात

Mutual Fund म्हणजे काय? कशी करावी गुंतवणूक? सर्व प्रश्नांची उत्तरं सोप्या शब्दात

सध्याच्या काळात लोक गुंतवणूक करण्यावर भर देत आहेत. यामध्ये म्यूच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात लोक गुंतवणूक करत आहेत. याविषयीच सर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

110

म्यूच्युअल फंडविषयी तुम्ही कधीना कधी ऐकले असेलच. मात्र यामध्ये गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. कारण त्यांना याविषयी पुरेशी माहितीच नसते. अशा लोकांना त्यांचे पैसे बुडण्याची भिती वाटते. ही भीती दूर करायचीये ना? मग जाणून घ्या म्यूच्युअल फंडविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे...

210

म्यूच्युअल फंड म्हणजे काय? म्यूच्युअल फंड एक असा फंड आहे, जो AMC म्हणजेच एसेट मॅनेजमेंट कंपनीज ऑपरेट करते. या कंपन्यांमध्ये अनेक लोकांनी पैसे गुंतवलेले असतात. म्यूच्युअल फंड द्वारे हे पैसे बॉन्ड, शेअर मार्केटसह अनेक ठिकाणी गुंतवले जातात.

310

सोप्या शब्दात सांगायचं झालं तर म्यूच्युअल फंड अनेक लोकांच्या पैशांनी बनलेला फंड असतो. यामध्ये एक फंड मॅनेजर असतो. तो फंड सुरक्षित पद्धतीने वेगवेगळा करुन विविध ठिकाणी गुंतवला जातो. म्यूच्युअल फंडने तुम्ही फक्त शेअर मार्केटच नाही तर गोल्डमध्येही गुंतवणूक करु शकता.

410

आता AMC म्हणजे काय? तर अशा कंपन्या विविध गुंतवणूकदारांनी जमा केलेला निधी इक्विटी, बाँड, सोने इत्यादींमध्ये गुंतवतात. या गुंतवणुकीतून मिळणारा परतावा फंड युनिट्सनुसार गुंतवणूकदारांमध्ये वितरीत करतात. एक चांगला फंड मॅनेजर फंडाची योग्य प्रकारे गुंतवणूक करुन त्यावर जास्तीत जास्त परतावा मिळवू शकतो. ज्यामुळे गुंतवणूकदाराला चांगला परतावा मिळेल.

510

आता म्यूच्युअल फंड कसं काम करतं? तर म्युच्युअल फंडाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीसाठी मोठ्या रकमेची गरज नसते. तुम्ही फक्त 500 रुपयांपासूनही गुंतवणूक सुरु करु शकता. समजा तुम्हाला एखाद्या कंपनीच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची आहे, परंतु एका शेअरची किंमत 25,000 रुपये आहे. परंतु म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून तुम्ही अशा कंपन्यांमध्ये फक्त 500 रुपयांमध्ये गुंतवणूक करू शकता. म्युच्युअल फंड सर्व गुंतवणूकदारांकडून 500-500 रुपये जमा करून त्या कंपनीमध्ये मोठी रक्कम गुंतवतो.

610

आता म्यूच्युअल फंडचे फायदे काय? म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला जास्त विचार करायची गरज नसते. कारण ज्या कंपनीमध्ये तुम्ही गुंतवणूक करता, तिची ग्रोथ काय आहे? हे पाहण्याचं काम फंड मॅनेजर करतो.

710

म्यूच्युअल फंडचा आणखी एक फायदा म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या सेक्टर आणि अॅसेटमध्ये गुंतवले जातात. समजा एखादं सेक्टर जसं की, बँकिंग किंवा ऑटो सेक्टरमध्ये एखाद्या कारणामुळे मंदी आली. तर याचा संपूर्ण पोर्टफोलियोवर जास्त फरक पडणार नाही. कारण या सेक्टरमध्ये थोडीशी गुंतवणूक होईल. ज्यामुळे संपूर्ण पोर्टफोलियावर काही खास प्रभाव पडणार नाही.

810

तिसरा फायदा म्हणजे म्यूच्युअल फंडमध्ये तुम्ही 500 किंवा 1000 रुपयांपासूनही SIP ची सुरुवात करु शकता. किती अंतराने यामध्ये गुंतवणूक करता येईल हे देखील तुम्ही ठरवू शकता. म्हणजेच साप्ताहित, मासिक, तिमारी किंवा वार्षिकही गुंतवणूक असू शकते. अशा प्रकारे काही काळानंतर तुम्ही मोठी रक्कम जमा करु शकता.

910

कसं खरेदी करावं म्यूच्युअल फंड? यासाठी तुम्ही मोबाईल अॅप, एजेंटच्या माध्यमातून किंवा ऐसेट मॅनेजमेंट कपनीच्या वेबसाइटवर जाऊन सहज म्यूच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करु शकता. आज असे अनेक प्लॅटफॉर्म लॉन्च झालेय. ज्याच्या माध्यमातून तुम्ही एकाच ठिकाणावरुन अनेक म्यूच्युअल फंड स्किम खरेदी करु शकता.

1010

एवढंच नाही तर तुम्ही आपली म्यूच्युअल फंड स्किमची ग्रोथ, रिटर्नची तुलना किंवा ट्रॅकिंगही सहज करु शकता. ऑनलाइन गुंतवणुकीने म्यूच्युअल फंडला जास्तच सोपं केलंय.

  • FIRST PUBLISHED :